Chandrayaan 3 : ज्यांच्या मार्गदर्शनामुळे भारताने इतिहास रचला ते एस सोमनाथ कोण आहेत?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Life journey of S Somnath and his work in ISRO
Life journey of S Somnath and his work in ISRO
social share
google news

Chandrayaan 3 : देशाच्या चांद्रयान 3 या मोहिमेमुळे साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागून राहिले होते. चांद्रयान 3 च्या (chandrayaan 3) विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यामुळे जगात भारताने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान 3 च्या यशात इस्रोचे (ISRO) प्रकल्प संचालक पी वीरामुथुवल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड मोठी मेहनत दिसून येत आहे. ही संपूर्ण यशस्वी मोहिम इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली आहे.

ADVERTISEMENT

थक्क करणारा रंजक प्रवास

एस सोमनाथ हे स्पेस इंजीनियरिंगबरोबरच ते या संबंधात अनेक गोष्टींमध्ये त्यांना तज्ज्ञ मानले जाते. वयाच्या 57 व्या वर्षी ते इस्रोचे प्रमुख झाले आहेत. त्यामुळे या मोहिमेपर्यंतचा त्यांचा प्रवास रंजक आहे आणि त्यांच्या या यशाच्या प्रवासासह रंजक आहे.

हेही वाचा : Chandrayaan-3 : हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी खर्च…,चांद्रयान 3 चे बजेट किती?

शाळा ते आयआयटी

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांची जानेवारी महिन्यामध्ये त्यांची इस्रोच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली होती. इस्त्रोच्या प्रमुखपदी येण्याआधी एस सोमनाथ यांची विक्रम साराभाई आंतरिक्ष केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले होते. त्या एस सोमनाथ यांचा जन्म जुलै 1963 मध्ये केरळमधील अलापुझा जिल्ह्यात झाला. एस सोमनाथ यांचे पूर्ण नाव श्रीधर परिकर सोमनाथ आहे.

अभ्यासतही टॉपरच

सोमनाथ यांचे प्रारंभीचे शिक्षण स्थानिक शैक्षणिक संस्थेमधून झाला. त्यानंतर सोमनाथ यांना केरळमधील कोल्लममधील टीकेएम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्याच कॉलेजमधून त्यांनी मॅकेनिकल इंजीनिअरिंगची पदवी घेतली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना अभ्यासातही ते अगदी टॉपर होते.

आयआयटीचा सुवर्ण गौरव

केरळमध्ये पदवी घेतल्यानंतर मात्र त्यांनी बंगळुरूमधील इंडियन इन्सिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी पदवीत्तर शिक्षण घेत आयआयटीमधून त्यांनी सुवर्णपदकही प्राप्त केले होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना स्पेस सायन्सची आवड निर्माण झाली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chandrayaan-3 Landing VIDEO: भारताचं चंद्रावर पहिलं पाऊल, पुन्हा-पुन्हा पाहावा असा ऐतिहासिक क्षण!

अनेक मोहिमेमध्ये तज्ज्ञ

वैज्ञानिक एस सोमनाथ हे एकाच विषयाचे तज्ज्ञ आहेत असं नाही तर त्यांची अनेक विषयामध्ये ते तज्ज्ञ आहेत. एस. सोमनाथ हे लाँच व्हेईकल सिस्टीम इंजीनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स, मेकॅनिझम डिझाईन आणि पायरोटेक्निक्स या विषयातही त्यांचे कौशल्य वाखणण्यासारखे आहे. देशातील सर्वात शक्तिशाली अंतराळ रॉकेट GSLV MK-III लाँचर विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. सोमनाथ 2010 ते 2014 पर्यंत GSLV Mk-III प्रकल्पाचे संचालक होते. तर या अंतराळयानातून उपग्रह प्रक्षेपित केले जातात. GSLV (जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेईकल) च्या तीन यशस्वी मोहिमांमध्ये आणि पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) च्या 11 यशस्वी मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे स्पेस इंजीनिअरिंगमध्ये त्यांना नेहमीच एक वेगळे स्थान दिले आहे.

ADVERTISEMENT

जबाबदाऱ्याही मोठ्या

इस्रोच्या वेगवेगळ्या समितीवर काम करत असतानाच त्यांनी अनेक मोठमोठ्या जबाबदऱ्याही पार पाडल्या आहेत. त्यामुळे 2014 नंतर त्यांना इस्त्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरच्या प्रमुखपद त्यांना देण्यात आले होते.

चांद्रयान-2 मध्येही महत्वाची भूमिका

LPSC अंतराळात उपग्रह घेऊन जाणाऱ्या अंतराळयानासाठी लिक्विड प्रोपल्शन प्रणाली प्रदान करते. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रणालीचा वापर करून अनेक यशस्वी उपग्रह प्रणाली पूर्ण केल्या गेल्या आहेत. त्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळेच 22 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत साराभाई स्पेस सेंटरच्या संचालकपदावर ते कार्यरत होते. यापूर्वी चांद्रयान-2 च्या लँडरचे इंजिनही सोमनाथ यांनीच विकसित केले होते. इस्रोच्या जवळपास सर्व मोहिमांमध्ये सोमनाथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच वयाच्या 57 व्या वर्षी त्यांना इस्रोच्या प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

एस सोमनाथ अनेक पुरस्कारांचे मानकरी

सोमनाथ यांना त्यांच्या कामगिरीबद्दल अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (ASI) ने सुवर्णपदक प्रदान केले आहे. तर GSLV मार्क-III साठी 2014 मध्ये परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्डही त्यांना बहाल करण्यात आला आहे. इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजीनिअरिंगचे फेलो. ते इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ एस्ट्रोनॉटिक्स (IAA) चे संबंधित सदस्यही म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT