Hair Care Tips : झोपताना केस बांधावे की खुले सोडावे? एक्सपर्टने सांगितला सर्वात बेस्ट उपाय
Hair Care Tips : केसांमुळे तुमच्या सौंदर्यात वाढ होते, असं नक्कीच म्हणता येईल. हेल्दी, शायनी आणि लांब केस असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रात्री झोपताना केसांची कशी काळजी घ्याल?

रात्री झोपताना केस खुले सोडल्यावर काय होतं?

एक्सपर्ट याबाबत काय सांगतात?
Hair Care Tips : केसांमुळे तुमच्या सौंदर्यात वाढ होते, असं नक्कीच म्हणता येईल. हेल्दी, शायनी आणि लांब केस असावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्हालाही केसांची योग्य पद्धतीने काळजी घ्यायची असेल, तर ही माहिती जाणून घ्या. केसांच्या मजबूतीसाठी शॅम्पू, हेयर ऑईलच्या पद्धतींवर लक्ष देणं आवश्यक नाहीय. याशिवाय छोट्या मोठ्या सवयी सुद्धा केसांच्या कंडिशनवर थेट प्रभाव टाकतात.
रात्री झोपताना केसांना खुलं ठेवलं पाहिजे की केस बांधून झोपंल पाहिजे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल, तर आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. अनेक लोक रात्री झोपताना केसांना टाईट बनमध्ये बांधून झोपतात. जेणेकरून केस एकमेकांना गुंतणार नाहीत आणि चेहऱ्यावर पसरणार नाहीत. परंतु, यापैकी कोणती पद्धत योग्य आहे, याबाबत एक्सपर्टने महत्त्वाची माहिती दिली आहे.
हे ही वाचा >> केदार जाधव आहे तरी कोण... नेमका इतिहास काय, भाजपमध्येच का केला प्रवेश?
काय सांगतात एक्सपर्ट?
प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट जुशिया भाटिया सरीनने त्यांच्या यू ट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्कीन आणि ऐयर हेअर एक्सपर्ट म्हणतात, रात्रीच्या वेळी केसांना मोकळं सोडून झोपलं पाहिजे की केस बांधून झोपलं पाहिजे, हे तुमच्या केसांच्या लांबीवर अवलंबून असतं. डॉ. सरीन सांगतात, जर तुमचे केस छोटे असतील, तर तुम्ही त्यांना खुले ठेऊन झोपू शकता. यामुळे झोपताना तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही. तसच त्यांना सांभाळणं खूप सोपं होईल.
हे ही वाचा >> 8th April 2025 Gold Rate : बाईईई...काय हा प्रकार! दोन दिवसांपूर्वी स्वस्त झालेलं सोनं पुन्हा महागलं, आजचे दर काय?
जर तुमचे केस लांब असतील, तर त्यांना बांधून झोपलं पाहिजे. लांब आणि खुले केस झोपताना ऐकमेकांमध्ये गुंतू शकतात. यामुळे केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. लांब केस मोकळे ठेवल्याने तुमच्या चेहऱ्यावर येऊ शकतात. यामुळे तुम्हाला झोपताना अडथळा तर निर्माण होईलच, याचसोबत एक्ने पिम्पलची समस्याही होऊ शकते.