Manoj Jarange Patil: ‘राजकारण्यांचे डाव उधळून लावले’, जरांगे पाटलांनी नेमकं ते सांगितलं
मराठा समाजासाठी चाललेले आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न झाले. मात्र आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्याचवेळी त्यांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी जे सरकारचे डाव होते ते उधळून लावले असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.
ADVERTISEMENT
Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी ऑगस्ट महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. ते आजही सुरुच आहे. सरकारने चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा मागणी करत जरांगे पाटील यांनी शांततेचे मार्गाने आंदोलन (Maratha Andolan) केले. मात्र आंतरवाली सराटीत (antarwali sarati) आंदोलनाच्या काही दिवसांनंतर पोलिसांना सोडून आंदोलन मोडून काढण्यासाठी लाठीचार्ज (Lathicharge) आणि अश्रूधुराचे नळकांड्या फोडून प्रयत्न करण्यात आले. मात्र हे आंदोलन आम्ही मोडू दिलं नाही, आणि सरकारचा हा डाव उधळून लावला असल्याचे स्पष्ट मत जरांगे पाटील यांनी मुंबई तकच्या चावडीवर व्यक्त केले.
ADVERTISEMENT
आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई तकच्या चावडीवर बोलताना सांगितले की, आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या. आपण आंदोलन मागे घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी त्यांनी आम्हाला पोलिसांकरवी निरोपही पाठवण्यात आले. त्यावेळी पाणी देऊन, गरज नसतानाही मला सलाईनही लावण्यात आली. त्यावेळी त्याची गरजही नव्हती. तरीही मला सलाईन लावण्यात आली. मात्र त्यांनी मला रुग्णालयात दाखल करण्याची तसदी का घेतली नाही हाच प्रश्न आहे असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
हे ही वाचा >>Manoj Jarange Patil: ‘आरक्षणासाठी पदाचा-सत्तेचा विचार करू नये’, जरांगे-पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
लाठीचार्ज का झाला?
मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, जर हे आंदोलन लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने चालले होते. तर मग यामध्ये पोलिसांना का घुसवण्यात आले. ज्यादिवशी आंदोलन मागे घ्यायचे होते. त्यावेळी त्यांच्या विनंतीनुसार मी पाणी घेतले आणि सलाईनही लावून घेतली. मात्र पुन्हा येऊन पोलिसांनी थेट आंदोलकांवर लाठीचार्ज का चालवला असा प्रश्न आता उभा राहिला आहे.
निर्णयावर आम्ही ठाम
मराठा आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत होतो. तरीही हे आंदोलन मोडून काढण्यासाठीच सरकारने आमच्या आंदोलनावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो म्हणूनच राजकीय नेत्यांनी आखलेले सर्व डाव आम्ही उधळून लावले असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
हे ही वाचा >> Mumbai : भटक्या कुत्र्यांना खायला घालणं तरूणीला पडलं महागात; झाली बेदम मारहाण!
आंदोलनात आडकाठी
मराठा आरक्षणासाठी चाललेले आंदोलन कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे मोडून काढायचे आहे. त्यामुळेच कधी कागदोपत्री अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर कधी कायद्याच्या कचट्यात हे प्रकरण टाकून आडकाठी टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र आता आम्ही सरकारला कायदा पारित करण्यासाठी जेवढे पुरावे पाहिजे तेवढे पुरावे द्यायला पाहिजे तेवढी आम्ही तयारी ठेवली आहे. त्यामुळे यानी कोणतेही डाव आखले असले तरी आता मागे हटणार नाही. आम्ही सरकारचे डाव उधळून लावत मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असंही त्यांनी आता स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT