Manoj Jarange Patil: ‘आरक्षणासाठी पदाचा-सत्तेचा विचार करू नये’, जरांगे-पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
मराठा समाजाला सरसरकट आरक्षण देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु झाले. मात्र त्या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आंदोलनावर लाठीचार्ज केला असल्याचा इशारा देत आता मागे हटणार नसून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही असा इशाराच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil: मागील ऑगस्ट महिन्यापासून चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) चाललेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई तकच्या चावडीवर व्क्त केले. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा कुणबी (Maratha Kunabi) समाजाला सरसकट आरक्षणासाठी रणशिंगे फुंकले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय नेत्यांना थेट इशारा देत राजकारण्यांनी ठरवले तर ते एका दिवसात कायदा पारित करू शकतात असंही यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
सरसकट आरक्षण द्या
आंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या मार्गातून सरकारकडे मागणी केली. मात्र शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीहल्ला केला गेला आणि हे आंदोलन चिघळले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नसल्याचे सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सर्व डाव उधळून लावले
मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत आंदोलन सुरु झाल्यानंतर आणि त्यांची प्रकृती खालवल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांनीही त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. सत्ताधाऱ्यांकडून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा आणि भरकटवण्याचाही प्रयत्न झाले. मात्र मी आता राजकारण्यांचे सर्व डाव उधळून लावले असल्याचेही त्यांनी सांगितले. कारण मी आता मराठा समाजाबरोबर गद्दारी करणार नाही असंही त्यांनी चावडीवर बोलताना सांगितले.
हे ही वाचा >>Cyclone: 2 चक्रीवादळांचं संकट घोंगावतंय, मुंबईसह महाराष्ट्राला किती धोका?
समाजाबरोबर गद्दारी करणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यापासून ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यानंतरही हे आंदोलन संपवून टाकण्यासाठी त्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या महिला आणि पुरुषांवरही त्यांनी लाठीचार्ज केला. मात्र तरीही आम्ही मागे हटलो नाही. कारण 1970 पासून मराठा समाजाचे आरक्षण मिळाले नसल्यामुळे समाजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. मात्र आता राज्यातील कोणताही नेता आला आणि अश्वासनं मिळाली तरीही मराठा समाजाबरोबर मी गद्दारी करणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Adani : ‘शरद पवार पंतप्रधान असते, तर…’, राहुल गांधींनी पवारांना केले ‘सेफ’
ADVERTISEMENT