Mumbai 26/11 Attack : मोस्ट वॉन्टेड अतिरेकी कैसर फारुकची हत्या, Video Viral

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pakistan Lashkar-e-Taiba terrorist organization, Hafiz Saeed Qaiser Farooq shot dead
Pakistan Lashkar-e-Taiba terrorist organization, Hafiz Saeed Qaiser Farooq shot dead
social share
google news

Mumbai 26/11 Attack : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड (most wanted) दहशतवादी आणि हाफिज सईदचा (Hafiz Saeed) सगळ्यात जवळचा मानला गेलेला पाकिस्तानातील दहशतवादी कैसर फारुख ठार (Qaiser Farooq Death) झाल्याचे वृत्त आले आहे. त्याचा त्याबाबतचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba)या दहशतवादी संघटनेच्याच दहशतवादी कैसर फारुख याच्याच हत्येचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. (mumbai 26/11 terror attack most wanted terrorist qaiser farooq killed karachi viral video close to hafiz saeed)

ADVERTISEMENT

कराचीतील व्हिडीओ व्हायरल

मोस्ट वाँटेड दहशतवादी कैसर फारुख याच्या हत्येचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा त्याचाच आहे. मात्र त्याबद्दल कोणतीही वेळ आणि ठिकाण सांगितले जात नाही. त्यामुळे त्याची हत्या कधी झाली हे मात्र अजून कळू शकले नाही. त्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीला गोळी मारण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती कराचीतील एका रस्त्यावरुन फिरत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याला गोळी मारल्यानंतर मात्र इतर लोकं जीव वाचवण्यासाठी लपून बसताना दिसत आहेत.

हे ही वाचा >>महागाईचा आगडोंब उसळणार!, सणासुदीच्या काळातच गॅस सिलिंडरच्या किंमती भडकणार

आणि गोळी झाडली

जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये काही लोकं गटा गटाने आली आहेत, आणि गोळीबार सुरु केला आहे. त्यावेळी एका व्यक्तीला गोळी लागली आहे तो खाली पडला आहे. त्यामध्ये जो ठार झालेला व्यक्ती आहे तो कैसर फारुख असल्याचे सांगितले जात आहे. कैसर फारुख हा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. तो मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि तोच प्रमुख असल्याचे मानले जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टार्गेट किलिंगची घटना

पाकिस्तानातील द डॉनच्या बातमीनुसार कराचीतील ईडी सेंटरजवळील गुलशन-ए-मदरसाजवळ काही लोकांनी अचानक गोळीबार केला होता. त्यामध्ये 30 वर्षाच्या कैसर फारुख आणि फारूख शाकीर यांना गोळ्या लागल्या होत्या. त्यामध्ये कैसर फारुखचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. मात्र, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी हाच कैसर फारुख असल्याचे तेथील मीडियाने म्हटले नाही. पाकिस्तान पोलिसांनी सांगितले की, ही टार्गेट किलिंगची घटना असून त्यामध्ये कैसर फारुख हा ठार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा >> शिवाजी महाराज वाघनखे : संजय राऊतांचा चढला पारा, शिंदे सरकारला म्हणाले…

आंतरराष्ट्रीय दहशतवादी

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद हाही 26 सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. त्यानंतर हे वृत्त आल्यानंतर कैसर फारुख ठार झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीन सईद हा मंगळवारपासून बेपत्ता होता. त्याचे काही जणांकडून अपहरण करण्याात आले होते. हाफिज सईद हा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड आहे, आणि तो आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने त्याला तुरुंगामध्ये बंद करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT