Mumbai: धक्कादायक, हृदयविकाराच्या झटक्याने गेला मुंबईतील 13 वर्षाच्या मुलाचा जीव!
मुंबईतील कांदिवलीमध्ये शाळकरी मुलाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. शाळेत हुशार असणाऱ्या आणि योगासन करतानाच त्याला हृदयविकाराने मृत्यू आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
Heart Attack : गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्या फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच किंवा वयोवृद्ध झालेल्या व्यक्तीनाच येतात असं नाही. तर आता माणूस जन्माला आल्यापासून त्याला कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. कारण मुंबईमधील कांदिवलीमध्ये (Kandiwali Mumbai) एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
शाळकरी मुलाचा अंत
कांदिवलीमध्ये एका शाळेला जाणाऱ्या मुलाला (13 Years Student) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने मृत्यू झाला आहे. अवघ्या 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने परिसरासह अनेकांना धक्का बसला आहे.
हे ही वाचा >> आत्याच्या मित्राचा भाचीवर बलात्कार, तर आत्या दुसऱ्या रुममध्ये भलत्याच तरुणासोबत…
अनेकांना धक्का
किशोर गधे हा 13 वर्षाचा शाळकरी मुलगा तो मूळचा जामनगरचा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो शाळेसाठी व अभ्यासासाठी मुंबईतील कांदिवलीमध्ये राहत होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या किशोर गधे हा शांत आणि मनमिळावू असा मुलगा होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
योगासन करतानाच मृत्यू
किशोर गधे हा योगासन करत होता. त्याच वेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितले. किशोरच्या निधनामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण इतक्या लहान वयात त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने अनेकांना त्यावर विश्वास बसला नाही.
हे ही वाचा >> पॉर्नस्टार मिया खिलाफाने ‘यांना’ दिला पाठिंबा, प्ले बॉयने दिली मोठी शिक्षा
डॉक्टरांनाही धक्का
किशोर गधे या शाळकरी मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह परिसरातील अनेक नागरिकांना धक्का बसला आहे. योगासन करताना हा प्रसंग त्याच्यावर आल्याने काही काळ त्याच्या कुटुंबीयांनाही त्याला नेमकं काय होतं आहे ते समजले नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा त्यातच मृत्यू झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT