Viral Video : लोकलमध्ये घडले Slap War, कॉलर पकडत एकमेकांची कानशिलं केली लाल…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai local train grabbed each other collars and fought two passengers slapped each other. This slap war viral on social media
Mumbai local train grabbed each other collars and fought two passengers slapped each other. This slap war viral on social media
social share
google news

Local Train: मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये (Mumabi Local Train) रोज नवनव्या घटना घडत असतात. कधी हाणामारी तर कधी माणुसकीला गहिवर आणणारे प्रसंग लोकलमध्ये घडत असतातच. हाणामारीच्या प्रसंगांनाही काही कमी नाही. कधी महिलांची तर कधी पुरुषांच्या हाणामारीचे (Slap war) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होतात, आणि लोकल ट्रेनचं अनोखं चित्र जगासमोर येतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लोकल ट्रेनमधील असून 27 तारखेला हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

कॉलर पकडून थप्पड

मुंबईच्या लोकलमधील व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ ट्विटरच्या मुंबई मॅटर्स या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. लोकलमधून प्रवास करताना दोन प्रवाशांनी एकमेकांच्या कॉलर पकडत त्यांनी एकमेकांच्या कानशिलात लगावत आहेत. दोघांकडूनही कॉलर पकडून थप्पड मारत वाद घालत आहेत. त्या व्हिडीओमध्ये थप्पड मारतानाचाही आवाज येत आहे. तर त्यांच्या बाजूला असलेल्या एका प्रवाशाने त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> भारताच्या हरितक्रांतीचे जनक स्वामीनाथन यांचे निधन, रॅमन मॅगसेसेने झाला होता गौरव

वादाचा व्हायरल व्हिडीओ

लोकलमधील जागेवरुन होणारे वाद काही नवीन नाहीत मात्र काल व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कॉलर धरुन होणारी हाणामारी अनेक जण पाहत आहेत. मात्र त्यामध्ये कुणीही दोन प्रवाशांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीत.

हे ही वाचा >> मुंबई Tak चावडी: ‘…तर त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं?’, ‘मनातली मुख्यमंत्री’वरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?

स्लॅप वॉर

लोकलमधील हे स्लॅप वॉर प्रचंड व्हायरल झाले असून अनेक जणांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा मारामारीचा व्हिडीओ व्हायरल होताच एकाने जुन्या व्हिडीओची आठवण करुन दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी तो कोणत्या मार्गावरच आहे हे मात्र समजू शकले नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT