Meera Borwankar: अजित पवारांना थेट भिडलेल्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण?
Meera Borwankar vs Ajit Pawar माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट आरोप करून एकच खळबळ उडवली आहे. जाणून घ्या मीरा बोरणवकर आहेत तरी कोण
ADVERTISEMENT
Former IPS Officer Meera Borwankar Profile: मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे (Pune) पालकमंत्री होताच जुन्या एका प्रकरणानं डोकं वर काढलं आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी तत्कालीन पालकमंत्री (अजित पवार) यांच्यावर आरोप केले. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. पण, अजितदादांवर आरोप करणाऱ्या मीरा बोरवणकर नेमक्या कोण आहेत? (profile of former ips officer meera borwankar who made serious allegations against dcm ajit pawar)
ADVERTISEMENT
कोण आहेत मीरा बोरवणकर?
मीरा बोरवणकर कोण आहेत? हे जाणून घेण्याआधी त्यांनी 2010 मध्ये पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर काय आरोप केले यावर एक नजर टाकूया. मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी तेव्हाच्या पालकमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय घडलं होतं हे सांगितलं.
पालकमंत्र्यांच्या हातात येरवडा पोलीस ठाण्याचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की, ‘या जागेचा लिलाव झालेला आहे. तुम्ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडा. पण, त्यासाठी मी त्यांना नाही म्हटलं’, असा दावा बोरवणकरांनी केला आहे. बोरवणकरांच्या याच आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा >> शरद पवारांना दिवाळीत ‘झटका’! बडा नेता अजित पवारांकडे जाणार, कॅबिनेटमंत्र्याचा दावा
पण, थेट अजित पवारांना भिडणाऱ्या आणि त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या मीरा बोरवणकर कोण आहेत? याचविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
मीरा बोरवणकर या 1981 मध्ये महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या होत्या. IPS अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या शहरात त्यांची बदली झाली. पण त्यांनी 1994 साली जळगावातील सेक्स स्कँडल उघडकीस आणलं आणि त्या प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर त्या मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या. तेव्हाही त्यांची भूमिका महत्वाची होती.
ADVERTISEMENT
मुंबईतील गुंडाराज संपवण्यामागे मीरा बोरवणकर यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी अंडरवल्डमधील दाऊद इब्राहीम आणि छोटा राजनच्या टोळीतील गुंडांना तुरुंगात टाकलेलं. त्यामुळे मुंबईतल्या या डॉनची टोळी सुद्धा मीरा बोरवणकर यांना घाबरायची. अबू सालेम, मोनिका बेदी, इक्बाल मिर्ची, तारिक परवीन आणि शर्मिला सीताराम नाईक उर्फ शर्मिला शानभाग यांच्या प्रत्यार्पणात देखील बोरवणकरांचा मोठा वाटा आहे.
ADVERTISEMENT
इतकंच नाहीतर त्या तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांच्याच निगराणीत याकूब मेमनला नागपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. पोलीस कारकिर्दीतला त्यांचा दरारा पाहून त्यांना लेडी सुपरकॉप म्हणून ओळखलं जायचं. मीरा बोरवणकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं म्हणजे त्या मूळच्या पंजाबमधल्या फाजिल्काच्या रहिवासी आहे. त्यांचे वडील ओ. पी. चढ्ढा हे बीएसएफमध्ये होते.
हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘ते म्हणाले, मॅडम, तुम्ही यात पडू नका..’, मीरा बोरवणकरांचा आणखी मोठा गौप्यस्फोट
मीरा यांचं दहावीपर्यंतचे शिक्षण फाजिल्का इथल्या सरकारी शाळेतून झालं. त्यानंतर त्यांच्या वडिलांची जालंधरला बदली झाली. त्यामुळे मीरा यांनी पुढचं शिक्षण जालंधरमधून पूर्ण केलं. पुढे महाराष्ट्रात नोकरीला असल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली. अशा या लेडी सुपरकॉप 2017 साली निवृत्त झाल्या.
आता त्यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून त्यांनी तेव्हाचे पालकमंत्री म्हणजे अजित पवारांवर आरोप केले आहेत. त्यावरून आता पुढे काय घडतं हे बघणं महत्वाचं आहे. अजित पवार, शिंदे-भाजपसोबत सत्तेत गेले. त्यानंतर यथावकाश अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रिपदही मिळालं. पण त्यानंतर काहीच दिवसात हे 2010 चं प्रकरण समोर येणं त्यावरून त्यांच्यावर आरोप होणं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT