Sharad Mohol : मोहोळ हत्येचे कराड कनेक्शन! पुणे पोलिसांनी एकाला केली अटक
शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले.
ADVERTISEMENT
पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात आता कराड कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी कराडमधून एकाला अटक केली आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
ADVERTISEMENT
धनंजय मारुती वटकर (रा.कराड) असे पुणे पोलिसांनी अटक केलेल्याचे संशयित आरोपीचे नाव आहे.
पुण्यातील शरद मोहोळ याची कोथरूडमधील सुतारदरा भागात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहचले आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Mla Disqualification : ठाकरेंच्या आमदारांना ऐकावाच लागणार शिंदेंचा आदेश!
शरद मोहोळ याचा तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके रवाना केली होती. या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली.
पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?
या गुन्ह्यात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. यामधे मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याचे समोर आले.
ADVERTISEMENT
पुणे पोलिसांनी कराडतील धनंजय वटकर या आरोपीला ताब्यात घेवून अटक केले आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने काही महत्वाची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवले, तरीही नार्वेकरांनी गोगावलेंना कशी दिली मान्यता?
धनंजय वाटकर याच्यावर कऱ्हाडातही यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च २०२३ मध्ये तब्बल चौदा पिस्तुलांसह दहाजणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात वटकर याचा सहभाग होता.
पोलिसांनी त्यालाही अटक केले होते. त्या गुन्ह्यामध्ये वटकरला जामिन मिळाला होता. जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनात हल्लेखोरांना पिस्तुल पुरविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT