Mumbai-Pune Weather Update: मुंबई-पुण्यात पावसाचा कहर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

मुंबई तुफान पाऊस, पुणे गेलं पाण्याखाली
मुंबई तुफान पाऊस, पुणे गेलं पाण्याखाली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-पुण्यात तुफान पाऊस

point

पुण्यात अतिमुसळधार पावसाने पूरस्थिती

point

पुण्यातील खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले

Mumbai Pune Rain Weather Update: मुंबई: मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात आज (25 जुलै) मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील 3 ते 4 तास अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

एकीकडे मुंबईत धो-धो पाऊस सुरू असताना दुसरीकडे पुण्यात अक्षरश: ढगफुटी सदृश पाऊस झाल्याची माहिती मिळते आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तुफान पावसाने पुणं पाण्याखाली...

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील सर्व शाळा आज (25 जुलै) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Mumbai Rain: मुंबईत पावसाचा प्रचंड धुमाकूळ; लोकल ट्रेनचं काय झालंय?

खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.

भिडे ब्रिज पात्रात अंडा भुर्जी स्टॉल काढायला गेलेल्या तिघांचा मृत्यू

आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पुण्यातील सुप्रसिद्ध भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील अंडा भुर्जी स्टॉल येथे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने तेथे काम करणारे तीन इसम हे त्यांचा अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरता गेले होते. पण त्यावेळी त्यांना अचानक विजेचा शॉक लागला. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

ADVERTISEMENT

विजेचा झटका लागून मृत्यू झालेल्या सदर इसमांची नावे खालील प्रमाणे 

ADVERTISEMENT

1. अभिषेक अजय घाणेकर (वय 25 वर्ष, रा. पूलाची वाडी डेक्कन)
2. आकाश विनायक माने (वय 21 वर्ष, रा. पूलाची वाडी डेक्कन)
3. शिवा जिदबहादुर परिहार (वय 18 वर्ष)

खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 35574 इतक्या क्यूसेक हा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 200 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.

हे ही वाचा>> Mumbai, Thane, Pune Rains and Weather Live updates : मुंबईत धुवाधार पाऊस, IMD चा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट!

दरम्यान, धरणातील पाणी सोडण्यात आल्याने शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी असं आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाकडून करण्या तआलं आहे. तसेच पुढील संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

  • भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
  • गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
  • शितळा देवी मंदिर डेक्कन.
  • संगम पूल पुलासमोरील वस्ती 
  • कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
  • होळकर पूल परिसर

पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी.  

ठाणे जिल्ह्यातही तुफान पाऊस 

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी भरू लागले आहे. पावसामुळे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, आग्रा रोड, बैलबाजार रोड, सहजानन चौकात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास येथे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. 

मुंबईकरांसाठी पुढचे 4 तास महत्त्वाचे

गेल्या तीन तासात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे सखल भागात पूर स्थिती निर्माण होऊ शकते, गाड्यांचा वेग मंदावतो, वाहतूक कोंडी होऊ शकते. 3,4 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान खात्याचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. 

येत्या तासाभरात पश्चिम आणि मध्य मार्गावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दादर, वरळी, वांद्रे, महालक्ष्मी, कुर्ला, बीकेसी, चेंबूर, घाटकोपर येथे सर्वाधिक पाऊस पडेल, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुण्यात तुफान पाऊस, अजितदादा मंत्रालयातील नियंत्रण कक्षात ठाण मांडून

मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून राज्यातील प्रमुख शहरांचे महापालिका आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घेतली तसेच बचाव व मदतकार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. 

एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे. 

नागरिकांसाठी बचाव व मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. 

स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT