सकाळी उठल्या-उठल्या फॉलो करा 'या' 4 गोष्टी, नंतर दिवसभर...

मुंबई तक

Ayurvedic Tips: सकाळी उठल्याबरोबर आयुर्वेदाशी संबंधित काही नियमांचे पालन केल्याने तुमच्या शरीराची नैसर्गिक लय राखण्यास मदत होते. या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

ADVERTISEMENT

आयुर्वेदाबाबत काही महत्त्वाच्या टिप्स (फोटो सौजन्य: Grok AI)
आयुर्वेदाबाबत काही महत्त्वाच्या टिप्स (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयुर्वेदाचे विशेष फायदे काय आहेत?

point

सकाळी उठल्यानंतर आयुर्वेदाच्या नियमांचे करा पालन

point

चार टिप्स बदलतील तुमची जीवनशैली

मुंबई: भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाचे विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदात शरीरासाठी फायदेशीर असलेले अनेक नियम सांगितले गेले आहेत. यामध्ये असे काही नियम आहेत ज्यांचे सकाळी उठल्यानंतर पालन करणं आरोग्यदायी मानलं जातं. सकाळी उठल्यानंतर या नियमांचे पालन केल्याने शरीर डिटॉक्सीफाय होण्यास तसेत निरोगी राहण्यास मदत होते. हे नियम शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्याच्या दृष्टीने फायदेशीर मानले जातात. आयुर्वेदातील या आरोग्यदायी नियमांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सकाळी योग्य वेळेत उठणे

आयुर्वेदानुसार, आपल्या सर्वांनाच ब्राम्ह मुहूर्त म्हणजेच सकाळी 4:30 ते 6 या वेळेत उठले पाहिजे. ही वेळ शांततेसाठी आणि अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची मानली गेली आहे. 2012 मध्ये प्रकाशित झालेल्या स्टडीनुसार, सकाळी लवकर उठल्याने शरीराची ऊर्जा संतुलित राहण्यास मदत होते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावर उठल्याने आपले शारीरिक चक्र संतुलित राहते त्यासोबतच मानसिक शांतता मिळण्यास मदत होते.

हे ही वाचा>> Hair Care Tips : झोपताना केस बांधावे की खुले सोडावे? एक्सपर्टने सांगितला सर्वात बेस्ट उपाय

चेहरा तसेच डोळे थंड पाण्याने धुवा

सकाळी उठल्यावर चेहरा आणि डोळे थंड पाण्याने धुतल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. असे केल्याने चेहऱ्यावरील विषयुक्त पदार्थ काढून टाकता येतात आणि इंद्रिये ताजेतवाने ठेवता येतात. डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ड्रायनेस दूर करण्यासाठी आयुर्वेदात सकाळी उठल्यानंतर चेहरा आणि डोळे थंड पाण्याने धुण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडल्याने शरीरातील सतर्कता वाढते आणि मज्जसंस्थेचे कामदेखील सुरळीत होण्यास मदत होते. 

जीभ स्वच्छ ठेवणे आवश्यक

जीभ स्वच्छ करणे हे आपल्या मॉर्निंग रुटीनमधील एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर जीभ स्वच्छ केल्याने रात्रभर जीभेवर जमलेले विषयुक्त पदार्थ नष्ट होतात. तांबे किंवा स्टीलच्या टंग क्लीनरचा वापर करुन जीभ स्वच्छ केल्याने बॅक्टेरिया दूर होतात. यासोबतच पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत होते. जीभ स्वच्छ केल्याने तोंडातील दुर्गंधेपासून सुटका मिळवता येते.

हे ही वाचा>> कोणत्या तेलाच्या सेवनामुळे Heart Attack चा धोका वाढतो? कोणतं OIL आहे सर्वात बेस्ट? जाणून घ्या

प्राणायमाची सवय

प्राणायम म्हणजेच श्वास रोखण्याचा अभ्यास. प्राणायम फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. दररोज सकाळी प्राणायम केल्याने मेंदूतील ब्लड सर्क्यूलेशन सुरळीत होते. यामुळे फुफ्फुसे डिटॉक्सीफाय होण्यास तसेच तणाव कमी होण्यास मदत होते. 2014 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अध्ययनानुसार, प्राणायम केल्याने श्वसनासंबंधी विकार दूर होण्यास मदत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp