Maharashtra Weather: पालघर, ठाणे, मुंबईत पावसाच्या सरी कोसळणार! नागपूरसह 'या' जिल्ह्यात वाहणार वादळी वारे
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पडतील पावसाच्या धारा?

या जिल्ह्यात वाहणार सोसाट्याचा वारा

कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?
Maharashtra Weather Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल गुरुवारी कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीत उकाडा वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होतं.
तर मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि कोल्हापूमध्ये जवळपास 40 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं होतं. दरम्यान आज शनिवारी 12 एप्रिलला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, ,धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, हिल्यानगरमध्ये कोरडं हवामान असणार आहे. सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट परिसर, सोलापूर, नांदेड, लातूरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा >> अजितदादांच्या मुलाला क्लिन बोल्ड करणारी ऋतुजा पाटील आहे तरी कोण?, जय पवारांची कशी पडली विकेट?
कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसच 30-40 किमी प्रती वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळमध्ये प्रादेशिक हवामान विभागाने कोणताही इशारा दिला नाही.
हे ही वाचा >>पुण्यात पुन्हा तसाच प्रकार! सिम्बायोसिसच्या डॉक्टरने मागितले 20 हजार, म्हणाले ऑपरेशन करायचं असेल तर...
मागील काही दिवस मुंबईत उष्णतेच्या लाटा पसरल्याचं चित्र होतं. मुंबई शहर आणि उपनगरात जवळपास 34 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. आजही मुंबईत ३५°C आणि २५°C च्या आसपास तापमानाची नोंद असण्याची शक्यता आहे.