लव्ह मॅरेज केलं पण एक वर्षानंतर संसार मोडला! बायकोच्या 'त्या' इन्स्टाग्राम स्टोरीमुळे नवऱ्याने स्वत:ला संपवलं
Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून खूप दुखद घटना समोर आली आहे. वैवाहिक जीवनातील तणावाला कंटाळून एका 24 वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लव्ह मॅरेज झालेल्या जोडप्याचं एका वर्षातच लग्न मोडलं!

दोघांचीही नोकरी गेली अन् घडलं भयंकर

त्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे राजने केली आत्महत्या
Crime Latest News : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून खूप दुखद घटना समोर आली आहे. वैवाहिक जीवनातील तणावाला कंटाळून एका 24 वर्षाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राज आर्य असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. प्रेम विवाहातून तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याचं समजते.
प्रेमविवाहातून सुरु झाली कहाणी पण नंतर...
राजने अप्रिल 2024 मध्ये सिमरन (23) प्रेमविवाह केला होता. दोघेही लग्नाआधीपासून एका कंपनीत काम करत होते. परंतु, काही दिवसांपूर्वी दोघांची नोकरी गेली. यामुळे दोघांना आर्थिक आणि मानसिक तणावाला सामोरं जावं लागलं. घटना घडण्याच्या 45 दिवस आधीच एका मुलीचा जन्म झाला होता. परंतु, कौंटुबिक वादविवाद संपले नाहीत.
हे ही वाचा >> शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलावलं, सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाज सोडून... पोक्सो अंतर्गत गुन्हा
वावविवाद, सासर आणि इन्स्टा स्टेटस
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, राज आणि सिमरन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरु होतं. 10 दिवस आधी त्या दोघांमध्ये मोठं भांडण झालं होतं आणि त्यानंतर सिमरन माहेरी गेली होती. बुधवारी सकाळी सिमरनने तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर दोन पोस्ट शेअर केले होते. एका पोस्टमध्ये लिहिलं होतं, तो सकाळी साडेवाजेपर्यंत जेलमध्ये असेल आणि दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, आता जेलमध्ये जा..या पोस्टच्या काही तासानंतरच राजने आत्महत्या केली.
हे ही वाचा >> ST कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्केच पगार, MSRTC मध्ये नेमकं काय घडतंय, नेमकं प्रकरण काय?
आई...मी कायमचा झोपणार आहे
राजच्या आईने सांगितलं की, फाशी घेण्याआधी त्याने मला सांगितलं होतं, आई...मी नेहमीसाठी झोपायला चाललो आहे. सुरुवातीला मी त्याच्या म्हणण्याला हलक्यात घेतलं. पण काही वेळानंतर राज जेव्हा त्याच्या रुममध्ये दिसला नाही, तेव्हा त्याची शोधाशोध सुरु झाली. छताच्या पंख्यावर लटकलेला मृतदेह पाहून आमच्या पायाखालची जमिनच सरकली. दरम्यान, या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर राजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सर्कल ऑफिसर अजय कुमारने माहिती दिली की, कुटुंबियांकडून लिखित तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. पोलिसांकडून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुकु आहे.