Pune News : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 3 वर्षापासून बेपत्ता व्यक्तीचा फोटो, कुटुंबियांना बसला हादरा

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde mukhyamantri teerth darshan yojana advertisement since 3 years missing person photo
जाहिरातीवर 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरकारने जेष्ठांसाठी तिर्थ दर्शन योजनेची घोषणा केली आहे.

point

योजनेच्या जाहिरातीवर 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आला

point

मागील तीन वर्षापासून ते घरी आलेच नाही

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Advertisement : राज्यातील महायुती सरकारने जेष्ठांसाठी तिर्थ दर्शन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची जेष्ठांमध्ये बरीच चर्चा आहे. असे असताना आता एका वेगळ्याच कारणामुळे तिर्थ दर्शन योजना चर्चेत आली आहे. या मागचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या योजनेच्या जाहिरातीवर 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे जाहिरातीवर 3 वर्षापासून बेपत्ता व्यक्तीचा फोटो आल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. (eknath shinde mukhyamantri teerth darshan yojana advertisement since 3 years missing person photo) 

तिर्थ दर्शन योजनेच्या जाहिरातीवर झळकलेल्या ज्येष्ठाच्या कुटुंबियांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली आहे. शिरूर तालुक्यातील वरुडे या गावातील ज्ञानेश्र्वर विष्णू तांबे 68 वर्षीय वृध्द हे गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असल्याचे त्यांची सून सुरेखा तांबे यांनी सांगितले आहे. सासरे हे महिना महिना घरी येत नसायचे मात्र मागील तीन वर्षापासून ते घरी आलेच नाही, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही तक्रार आम्ही केली नाही. पण आता जाहिरातीवर फोटो पाहून आनंद झाल्याचं सुरेखा तांबे म्हणाल्या.

हे ही वाचा : Mumbai Weather Forecast : मुंबईकरांनो, रविवारही अतिमुसळधार पावसाचाच!

सासऱ्यांना सवयच होती, बऱ्यापैकी ते बाहेर राहायचे. पाहुण्यांकडे घरी जायचे. महिनोंमहिने ते घरी यायचेच नाही. तसेच याही वेळेला गेले होते. आम्हाला वाटलं की ते येतील परत, पण ते का आले नाही. नंतर आम्ही आमच्या पाहुण्यांकडे त्यांच्याबद्दल बरीच चौकशी केली. मात्र कुणीही त्यांच्याजवळ आल्याची माहिती दिली नाही, असे सुरेखा तांबे यांनी म्हटले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल केली नाही. कारण ते गेले की परत यायचे. मध्यंतरी गेले ते वर्षभरानंतर घरी आले होते. त्यामुळे आम्हाला आशा होती की ते परत येतील. त्यामुळे आम्ही कोणतीही तक्रार दिली नाही,असे सुरेखा तांबे यांनी सांगितले. 

जाहिरातीवर फोटो पाहून आम्हाला आनंदच झाला. आमच्या सगळ्या गावातील लोकांनी, सगळ्यांनीच पाहिला. प्रत्येकाच्या फेसबूकला, व्हॉट्सअॅपला फोटो पाहून आनंद झाला, असे सुरेखा तांबे यांनी म्हटले. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Pune : सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आमदारासोबत खडाजंगी, डीपीडीसी बैठकीत काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT