Gold Price Today : बाई...इतकं महाग झालं सोनं, रक्षाबंधनापूर्वी सोन्याचा भाव काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

  gold price rate in india 24k price increase 1150 rupees checke today gold silver rate in marathi
सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रक्षाबंधनापूर्वी सोन्याचे दर चांगलेच वाढले

point

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार

point

देशात आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Gold Silver Price Today : आजपासून दोन दिवसानी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे.  या सणापूर्वीच सोन्याचे दर चांगलेच वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर खाली आले होते, त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता सणासुदीच्या पुर्वसंध्येला सोन्याचे दर पुन्हा चढले आहेत. त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1150 रुपयांनी वाढला असून 18 कॅरेट सोन्याचा भाव 860 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. (gold price rate in india 24k price increase 1150 rupees checke today gold silver rate in marathi) 

ADVERTISEMENT

देशात आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारीही देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या दर वाढले होते. आजच्या सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर 17 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1150 रुपयांनी वाढला आहे, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 860 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला नाही. कारण देशात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Weather : मुंबईला पुन्हा पाऊस झोडपणार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?

देशात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जर आपण 22 आणि 18 कॅरेट सोन्याबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जर कालच्या शुक्रवारच्या दराबद्दल बोलायचं झालं तर 16 ऑगस्ट रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. याशिवाय 22 कॅरेट सोन्याचा भाव 65800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यासोबतच 18 कॅरेट सोन्याचा भाव 53840 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान देशातील विविध शहरांतील सोन्याची किंमत सराफा संघटना ठरवत असतात. सोन्याच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात. सोन्याची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते, त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही देशाची सेंट्रल बँक. कोणत्याही देशाच्या सेंट्रल बँकेचे सर्व रिझर्व्ह संपले तर सोन्याच्या किमतीत बरीच अस्थिरता निर्माण होते.

सोन्याचे विविध शहरातील दर 

दिल्ली 

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जर आपण 22 आणि 18 कॅरेट सोन्याबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

ADVERTISEMENT

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra Survey Poll: पुन्हा येणार महायुतीचं सरकार, पण... बुचकळ्यात टाकणारा ओपिनियन पोल

जयपूर

जयपूरमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू

आज बेंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,457 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. तरी देखील सणासुदीला ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT