Nagpur: जिथे भडकली हिंसा तिथून किती दूर RSS मुख्यालय आणि CM फडणवीसांचं घर?

मुंबई तक

Nagpur Violence: नागपूरमध्ये ज्या महाल परिसरात हिंसाचार झाला तिथून अगदी जवळच आरएसएसचं मुख्यालय होतं. तर मुख्यमंत्री फडणवीसांचं घरही तिथून केवळ 6 किमी दूर आहे.

ADVERTISEMENT

जिथे भडकली हिंसा तिथून किती दूर RSS मुख्यालय आणि CM फडणवीसांचं घर?
जिथे भडकली हिंसा तिथून किती दूर RSS मुख्यालय आणि CM फडणवीसांचं घर?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये महाल परिसरात झाला हिंसाचार

point

महाल परिसरापासून मुख्यमंत्र्यांचे घर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय किती अंतरावर?

point

नागपूरमध्ये अचानक का पेटला हिंसाचार?

Nagpur Violence and RSS headquarter: नागपूर: नागपुरात काल (17 मार्च) झालेल्या हिंसाचारामुळे (Nagpur Violence) अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. कारण नागपुरात केवळ विधान भवनच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान (CM Devendra Fadnavis House) देखील आहे. ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या ठिकाणापासून आरएसएस मुख्यालय (RSS Headquarters) फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत शिवसेना (UBT)ने हा मुद्दा उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अनेक नेते नागपूरचे असल्याचेही म्हटले. 

हिंसाचार झाला तिथून RSS मुख्यालय किती लांब?

नागपूरच्या महाल परिसर आणि इतर जवळच्या भागात हिंसाचार झाला होता. दरम्यान, याच परिसरापासून आरएसएस मुख्यालय हे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. तर घटनास्थळापासून पोलीस आयुक्त कार्यालयाचे अंतर 5 किलोमीटर आहे. संघाचे मुख्यालय संघ बिल्डिंग रोडवरील डॉ. हेडगेवार भवन येथे आहे.

हे ही वाचा>> Nagpur Curfew : नागपूरमध्ये कर्फ्यू लागू, कोणकोणत्या परिसरात निर्बंध, काय काय बंद?

RSS कार्यालय ते महाल परिसर यामधील अंतर

हिंसाचार झाला तिथून CM फडणवीसांचं घर किती दूर?

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान हे हिंसाचार झालेल्या परिसरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निवासस्थान सिव्हिल लाईन्स परिसरात आहे तर पोलीस आयुक्तांचे कार्यालय सीबीआय कॉलनीत आहे.

हे ही वाचा>> Nagpur Violence: नागपूर हिंसाचारासाठी फडणवीसांनी 'छावा' सिनेमाला ठरवलं जबाबदार?

मुख्यमंत्री फडणवीसांचे निवासस्थान ते महाल परिसर यामधील अंतर

आरएसएसच्या बालेकिल्ल्यात हिंसाचार कसा घडला?, राऊतांचा सवाल

नागपूर हिंसाचाराबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "नागपूर हा आरएसएसचा बालेकिल्ला आहे. येथे त्यांचे मुख्यालय आहे. मोहन भागवतजी तिथे बसतात. कट्टर हिंदुत्वाचे कुळ तिथे बसले आहे. हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. तिथे हिंसा कोण करेल? भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील तिथलेच आहेत. जवळच चार मंत्री आहेत. अशावेळी कोणी धाडस करू शकेल का?'

'त्यामुळे त्यांच्या टोळीतील लोकच असा हिंसाचार भडकवतील. हा एका पॅटर्न आहे. स्वतःच्या लोकांद्वारे हिंदूंवर हल्ला करणे. हिंदूंना भडकवणे. भीती आणि दहशत निर्माण करणं. ते महाराष्ट्र आणि देशाला उद्ध्वस्त करणार आहेत. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मकोका लावावा.' असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

पुढे राऊत असंही म्हणाले की, 'हे लोक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन औरंगजेबाबद्दल बोलत आहेत. बाळासाहेब म्हणाले होते की, आमचे ध्येय अयोध्येत राम मंदिर बांधणे आहे. जर बाबरी आडवी येत असेल तर आम्ही ती हटवू. आमचा एकाच मशीद आणि कबरीशी वाद आहे. आमच्या मनात दुसरे काहीही नाही. आम्ही बाबरी हटवू. त्यांनी हे करून दाखवलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिवाजी महाराज हे कधीही नायक नव्हते.'

 

हे वाचलं का?

    follow whatsapp