Prashant Koratkar : फरार प्रशांत कोरटकरला पोलिसांनी कसं केलं अटक? वाचा Inside Story

मुंबई तक

Prashant Koratkar Arrest Inside Story : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणारे प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली.

ADVERTISEMENT

prashant koratkar arrested
prashant koratkar arrested
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी प्रशांत कोरटकरला केली तेलंगणातून अटक

point

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलं होतं आक्षेपार्ह विधान

point

प्रशांत कोरटकरांच्या अटकेविषयी जाणून घ्या सविस्तर

Prashant Koratkar Arrest Inside Story : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणारे प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. चार दिवसांपूर्वी कोरटकर चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता. तिथून तो तलंगणाला पळून गेला, अशी माहिती आहे. परंतु, कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरचा पाठलाग करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. 

25 फेब्रुवारीला कोरटकरांनी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. कोरटकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे महाराज यांच्याबाबतही अपशब्दाचा वापर केला होता. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून फरार झालेल्या कोरटकरांचा पोलीस शोध घेत होते.कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कोरटकरला काही दिवसांसाठी अंतरिम जामीन मिळाला होता.  त्यानंतर सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. 

हे ही वाचा >> VIDEO: शिंदे गटाचा आपसातच राडा, महिलेने शिंदेंच्या माजी नगरसेवकाला भर रस्त्यात बेदम चोपलं!

प्रशांत कोरटकरला अटक, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

प्रशांत कोरटकरला अटक केल्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली.ते म्हणाले,"कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणा येथील मनचरियाल याठिकाणी अटक केली. मनचरियाल रेल्वे स्टेशनच्या बाजूला त्याचं वास्तव्य होतं. कोल्हापूर पोलिसांचं पथक रवाना झालं. चंद्रपूर येथे काही दिवस वास्तव्यास होता. एक महिन्यामध्ये कोरटकरला कुणी कुणी मदत केली, त्या सगळ्यांचा तपास होणार आहे. उद्या सकाळी प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर पोलीस कोल्हापूरात येणार आहेत. तेलंगणावरून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

उद्या कोल्हापूरात येताच कोरटकरला न्यायालयात हजर करणार. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी तेलंगणा राज्यातल्या मंचरियाल इथून कोरटकरला ताब्यात घेतलं. उद्या सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान कोल्हापूरात येणार आहेत. काही टोल नाके, हॉटेल सीसीटीव्ही तपासण्यात आले. आरोपीने कुठे कुठे वास्तव्य केले, याबाबत चौकशीत माहिती समोर येईल. त्याला कोणी आश्रय दिला असेल, त्यांची सुद्धा चौकशी केली जाईल. पोलिसांकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्नच नव्हता.

हे ही वाचा >> Rahul Kanal : ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आले, IT ने मारलेली धाड; कोण आहेत राहुल कनाल?

आम्हीच हायकोर्टात गेलो होतो. जामीन फेटाळला जावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पोलीस अधिकारी त्याच्या संपर्कात होते. यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांचे पहिल्या दिवसापासून आदेश होते, कोणत्याही महापुरुषांच्याबद्दल कोणी बदनामीकारक बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. कोरटकर याला ताब्यात घेतले आहे, याबद्दल त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे", असंही महेंद्र पंडित म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp