IAS अश्विनी भिडेंसोबत भेदभाव, वर्णद्वेषी वागणूक, ब्रिटिश एअरवेज प्रवासात काय घडलं?
माझ्याकडे प्रिमियम क्लासचं तिकीट असताना ब्रिटिश एअरवेजने ओव्हरबुकिंगच कारण दिले आणि मला इकोनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास भाग पाडलं. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजवर भेदभाव आणि वर्णद्वेश करत असल्याचा आरोप केला होता.
ADVERTISEMENT
IAS Ashwini Bhide Allegation on British Airways : मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेज कंपनीच्या विमान प्रवासाचा अत्यंत वाईट अनुभव आल्याची घटना घडली आहे. ब्रिटिश एअरवेज प्रवासात भेदभाव आणि वर्णद्वेष झाल्याचा आरोप अश्विनी भिडे यांनी केला आहे. एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून भिडे यांनी ही तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आता ब्रिटिश एअरवेजने त्यांना दिलेल्या वागणुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. (ias ashwini bhide allegation on british airways discriminatory racist policies)
ADVERTISEMENT
प्रकरण काय?
अश्विनी भिडे यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून ब्रिटिश एअरवेजने दिलेल्या वागणूकीबद्दल संताप व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, तुम्ही लोकांची फसवणूक, भेदभाव किंवा वर्णद्वेष करता का? कुठलीही भरपाई न देता ओव्हरबुकिंग्सच्या खोट्या सबबी सांगून प्रिमियम इकोनॉमीचे तिकीट काढलेल्या प्रवाशाला ऐनवेळी इकोनॉमी सीटवरून प्रवास करायला लावला. ब्रिटिश एअरवेज अशीच वागते का? असा सवाल देखील अश्विनी भिडे यांनी उपस्थित केला होता.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : शाहांनी दिला स्पष्ट ‘मेसेज’! ४८ जागांसाठी १२ क्लस्टर, स्ट्रॅटजी काय?
माझ्याकडे प्रिमियम क्लासचं तिकीट असताना ब्रिटिश एअरवेजने ओव्हरबुकिंगच कारण दिले आणि मला इकोनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास भाग पाडलं. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजवर भेदभाव आणि वर्णद्वेश करत असल्याचा आरोप केला होता. तुम्ही डिजीसीएच्या नियमांच उल्लघन करता असे मी आतापर्यंत ऐकलं होतं आता जाणवलं देखील असल्याचा संताप भिडे यांनी व्यक्त केला.
हे वाचलं का?
Are you cheating or following discriminatory/racist policies @British_Airways ? How come u downgrade a premium economy passenger at check-in counter on false pretext of overbooking without even paying price difference forget about compensation? I’m told this is a common…
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) January 12, 2024
इतकच नाही तर भिडे यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि केंद्रिय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान भिडे यांच्या तक्रारीनंतर इतर प्रवाशांनी देखील एक्सवर ब्रिटिश एअरवेजमधून प्रवास करताना त्यांना आलेला अनुभव शेअऱ केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Shiv Sena : “ज्या माणसामुळे बाहेर पडावे लागले…”, शर्मिला ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT