Israel Hamas War: हमासने इस्रायलला पुन्हा डिवचलं, म्हणाले; ‘चुन चुन के..’

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Israel Hamas War One Hostage for One Rocket again Hamas threat warning to Israel
Israel Hamas War One Hostage for One Rocket again Hamas threat warning to Israel
social share
google news

Israel Palestine Attack: इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine) यांच्यात अनेक दशकांपासून सुरू असलेलं युद्ध पुन्हा एकदा आक्रमक झालं आहे. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर सुमारे 5000 रॉकेट डागले होते, त्यानंतर दोन्ही बाजूंच्या हल्ल्याने आता भयावह रूप धारण केले आहे. अशा या परिस्थितीत हमासने मोठी धमकी दिली आहे. (Israel Hamas War One Hostage for One Rocket again Hamas threat warning to Israel)

ADVERTISEMENT

युद्धादरम्यान, हमासचे प्रवक्ते अबू ओबेद यांनी एक विधान जारी केलं आहे की, ‘गाझा पट्टीवर इस्रायलने डागलेल्या एका रॉकेटचा बदला म्हणून पॅलेस्टाईनमध्ये एका इस्रायली बंधकाला सार्वजनिकपणे मारलं जाईल.’

Nagpur: मटणाच्या दुकानात वाद, चॉपरनेच सपासप वार करत घेतला गिऱ्हाईकाचा जीव!

हमासचे म्हणणे आहे की, ‘इस्रायलने गाझा पट्टीवर डागलेल्या रॉकेटचा बदला म्हणून एका इस्रायली बंधकाच्या फाशीचा व्हिडीओ रेकॉर्ड केली जाईल आणि नंतर ती ऑनलाइन पोस्ट केली जाईल.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील या युद्धात आतापर्यंत सुमारे 1300 हून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत. हे युद्ध हमासच्या दहशतवाद्यांनी सुरू केले होते, त्यानंतर इस्रायलने जोरदार पलटवार केला. इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले.

Crime News: चपलेने सोडवलं हत्येचं कोडं, कुऱ्हाडीचे घाव घालत केले होते तुकडे!

हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (7 ऑक्टोबर) गाझा पट्टीतून इस्रायलवर अचानक 5 हजार रॉकेट डागले. याशिवाय हमासच्या दहशतवाद्यांनी हवाई, जमीन आणि सागरी सीमेवरून घुसून नागरिकांवर हल्ले केले होते. हमासच्या या हल्ल्यांमध्ये सुमारे 1300 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. या हल्ल्यात चार अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला भर रस्त्यातच जाळून ठार मारलं

व्हाईट हाऊसने सांगितले की, या हल्ल्यांमध्ये अनेक अमेरिकन नागरिक मारले गेले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा देत अनेक मोठी पावले उचलली आहेत. तसेच इतर देशांना या संघर्षापासून दूर राहण्याचा इशारा दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT