Maharashtra Rain Update : रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी, इतर जिल्ह्यांमध्ये हवामान काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

According to IMD, there is a possibility of heavy rain in many places including Mumbai in the next 24 hours.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे.

point

मुंबई-गोवा महामार्ग चिपळूणवर रस्ता तुडुंब भरला

point

प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मान्सुन पुर्णपणे सक्रिय व्हायला सुरुवात झाली आहे. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला पावसाने अक्षरश झोडपलं आहे. अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणी माध्यमिक शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. या व्यतिरीक्त महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. (maharashtra mumbai weather news meteorological department weather forecast ratnagiri sidhudurg district many district yellow alert in the next 24 hours)

ADVERTISEMENT

महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert) 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या  (IMD) वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, रायगड, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड,नांदेड, जालना, ओंरगाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Worli Hit And Run Case : मिहीर शाहच्या गर्लफ्रेंडला पोलिसांनी घेतले ताब्यात, कारण...

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांना कुठल्याही प्रकारचा इशारा देण्यात आला नाही. इतर सर्व जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये

 कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे.   नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आव्हान प्रशासनाने केले आहे.  अनेक ठिकाणी बाजारपेठेतील रस्ते तसेच घरांमध्ये पाणी साचले असून दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.   मुंबई-गोवा महामार्ग चिपळूणवर रस्ता तुडुंब भरला आहे.  राजापूर, लांजा, चिपळूण, खेड तालुक्यातून जाणाऱ्या गावांचे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत.

हे ही वाचा : Worli Accident : मिहीर शाहाने दारू प्यायली होती का? बार मालकाने काय सांगितलं?

सिंधुदुर्गाला पावसाचा हाहाकार 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीवर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.उद्या दुपारी कॅबिनेटची बैठक आहे त्यापूर्वी प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच पुराच्या पाण्यात गाडी घालणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मी दिलेले आहेत,असे केसरकर यांनी सांगितले आहे. पुराची परिस्थिती अशीच राहील्यास सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत, असे देखील केसरकर यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT