Maharashtra Weather : मुंबईला पुन्हा पाऊस झोडपणार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
Maharashtra Weather News: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यात पावसाचा जोर वाढणार
या जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा
महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता
Mumbai Weather Forecast Today : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने त्रस्त झाला आहे. मात्र आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर पावसाने सुखावणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. (maharashtra Weather Forecast rain live update news today 17 august 2024 Cloudy weather in Mumbai yellow alert for these district)
ADVERTISEMENT
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
मुंबईत पुन्हा पाऊस होणार सक्रिय
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुटटीवर गेला आहे. त्यामुळे दररोज मुंबईकरांना सुर्याचे दर्शन होत आहे. या दर्शनामुळे मुंबईकर उकाड्याने चांगलाच त्रस्त झाला आहे. या उकाड्यापासून सुटका होण्यासाठी त्याचे डोळे आभाळाकडे लागले आहे. मात्र पावसाने काही त्यांच्यावर पाऊस बरसवला नव्हता. मात्र आता पावसाने पुन्हा सक्रिय होण्या चिन्हे दिली आहेत. त्यामुळे मुंबईत सुद्धा मुसळधार पावसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maharashtra Survey Poll: पुन्हा येणार महायुतीचं सरकार, पण... बुचकळ्यात टाकणारा ओपिनियन पोल
'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने ब्रेक घेतला होता.मात्र आता हा ब्रेक पुर्ण करून पावसाने पुन्हा पुनर्रागमन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, छ.संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद, अकोला,अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया,नागपूर, वर्धा वाशिम,यवतामळ या जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे
ADVERTISEMENT