Maharashtra Weather Today : झुळूक वाऱ्याची अन् चाहुल थंडीची! तुमच्या शहरात आज कसंय वातावरण?
Maharashtra Weather Update IMD Report : राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीने एन्ट्री केली आहे. तुमच्या शहरात आज (7 नोव्हेंबर 2024) हवामानाचा अंदाज (IMD) कसा असणार आहे? जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यातील 'या' भागात थंडीचा जोर?
मुंबईत हवामानाचा अंदाज काय?
Winter Weather in Maharashtra IMD Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. काही भागात ऑक्टोबर हीटने हैराण केलं तर काही ठिकाणी ऐन दिवाळीतही पावसाने हजेरी लावली. पण, दिवाळीनंतर थंडीची चाहुल लागणार असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. तो आता खरा ठरताना दिसतोय. कारण, दिवाळी संपताच पावसाने माघार घेतली आहे तर, राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीने एन्ट्री केली आहे. तुमच्या शहरात आज (7 नोव्हेंबर 2024) हवामानाचा अंदाज (IMD) कसा असणार आहे? जाणून घेऊया. (maharashtra weather forecast update Today 7 november winter season temperature IMD report mumbai pune)
ADVERTISEMENT
राज्यातील 'या' भागात थंडीचा जोर?
Winter Weather in these City of Maharashtra:दिवाळीनंतर पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. येथे आकाश निरभ्र असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याचबरोबर थंडीची तीव्रता वाढत असून आज किमान तापमानात 1 अंशांची घट झालीये. त्यामुळे कमाल तापमान 32 तर किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Amol Mitkari : बोलणारा आणि हसणारे दोघेही.... शरद पवार यांच्यावर सदाभाऊंची टीका, मिटकरी मोजक्या शब्दात बोलले
सातारा जिल्ह्यात देखील थंडीचा जोर वाढत आहे. दिवसा ऊन तर रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाली असून आज 17 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान तिशीपार राहील.
Kolhapur जिल्ह्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. सकाळी धुके, दुपारी ऊन तर रात्री हवेत गारवा जाणवतोय. आज देखील आकाश निरभ्र राहणार असून स्वच्छ सूर्यप्रकाश असणार आहे. कोल्हापूरमध्ये आज 32 अंश कमाल तर 19 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
हेही वाचा : Supriya Sule : "फडणवीसांवर केस व्हावी, त्यांनी राजीनामा द्यावा"; अजितदादांची आर. आर. आबांवर टीका, सुप्रिया सुळे भडकल्या
मुंबईत हवामानाचा अंदाज काय?
मुंबईत, Thane सारख्या जिल्ह्यात अजूनही दमट वातावरण आहे. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. पण रात्रीच्या वेळी थोडा थंडावा जाणवू लागला आहे. आज स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असणार आहे. कमाल तापमान 33 तर किमान 17 अंश सेल्सिअस राहील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT