Raju Patil : मनसे आमदाराने भाजपची उडवली खिल्ली; पाटील म्हणाले, ‘एक पीआय…’
कल्याण डोंबिवली महापालिकेवर भाजपचा महापौर बसवणार असे भाजपचे नेते म्हणताहेत. त्यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला कोंडीत पकडलंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे बदली प्रकरणावर पाटलांनी बोट ठेवलं.
ADVERTISEMENT
MNS MLA Raju : कल्याणमध्ये भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला होता. यावरून आता मनसे आमदार राजू पाटील (प्रमोद पाटील) यांनी भाजपची खिल्ली उडवलीये.
ADVERTISEMENT
झालं असं की कल्याण-डोंबिवलीत एका मुद्द्यावरून चर्चा रंगलीये. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असं भाजपकडून म्हटलं जात आहे. त्यावरून उलट सुलट बोललं जात आहे. याच मुद्द्यावर बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला चिमटे काढलेत.
भाजपला कोपरखळ्या… आमदार राजू पाटील काय म्हणाले?
राजू पाटील म्हणाले, “प्रत्येक पक्षाला, त्याच्या सदस्याला वाटत असतं की, आपल्या पक्षाचा महापौर बसला पाहिजे. आमचीही तीच इच्छा आहे. पण, कल्याण डोंबिवली महापालिकेबद्दल बोलत असाल, तर मला वाटतं की इथे भाजपचं काहीही चालणार नाही. विशेषतः शिंदे गटापुढे. त्यामुळे शिंदे गट म्हणेल, तेच होणार आहे.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> Sovereign Gold Bond : गोल्ड बाँड काय, परतावा किती, कशी करायची खरेदी? जाणून घ्या सर्वकाही
“महापौर बसवायचं पुढेच आहे. महापौर बसवायच्या वल्गना यांनी नंतर कराव्यात, आधी मानपाडा पोलीस ठाण्याचा सीनियर पीआय बसवा. भाजपने आधी पीआय बसवून दाखवावा, मग ते बागडे असतील तरी. शिंदे गटापुढे यांचं काही चालत नाही, त्यांनी वल्गना करू नये. तरीही आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. बहुमत तुम्हाला भेटलं तर बसवा”, असं राजू पाटील म्हणाले.
हेही वाचा >> Ajit Pawar: ‘…तर, मी राजकारण सोडतो’, शरद पवारांना अजित पवारांचं चॅलेंज
मानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकरण काय?
भाजपचे स्थानिक पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भाजपने पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी केली होती. याच मागणीवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष उफाळून आला होता. याच वादावरून आता राजू पाटील यांनी भाजपला आव्हान दिलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT