एग्जिट पोल

Budget 2024: मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला, अर्थमंत्री 'या' दिवशी सादर करणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

modi 3 0 government first union budget on 23 july finance minister nirmala sitharaman
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
social share
google news

Budget 2024 News : मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाचा आता मुहूर्त ठरला आहे. त्यानुसार आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) येत्या 23 जुलै 2024 रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. संसदेचे हे अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (modi 3 0 government first union budget on 23 july finance minister nirmala sitharaman) 

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प २३ जुलैला सादर होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर ट्विट करून याबाबतची माहिती दिली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यादरम्यान, 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

हे ही वाचा : Eknath Shinde : शिंदेंची रणनीती भाजपलाच देणार धक्का? ठाण्यात 'या' मतदारसंघासाठी जोरबैठका सुरू

सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी 22 जुलै 2024 ते 12 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्याच वेळी, केंद्रीय अर्थसंकल्प, 2024-25 23 जुलै 2024 रोजी लोकसभेत सादर केला जाईल. निवडणुकीचे वर्ष असल्याने यंदा दोनदा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आता सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी माहिती रिजिजू यांनी दिली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सीतारामन यांच्या नावे अनोखा रेकॉर्ड

दरम्यान हा अर्थसंकल्प सादर होताच सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. याआधी मोरारजी देसाई यांच्या नावावर सलग सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम होता. आता ज्याची बरोबरी सीतारामन यांनी केली आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : मविआ विरुद्ध महायुती... कुणाचा उमेदवार पडणार? 

ब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या 5.1 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. भांडवली खर्चावर भर देत सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात त्यात 16.9 टक्के वाढ केली होती. या अंतर्गत 11.11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे भांडवल 2.9 टक्के आणि रेल्वे मंत्रालयाचे भांडवल पाच टक्क्यांनी वाढले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT