मुंबईत भरधाव कारची सहा गाड्यांना धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbai accident news speeding car hit several cars 3 dies 6 injured shocking accident
mumbai accident news speeding car hit several cars 3 dies 6 injured shocking accident
social share
google news

Mumbai Accident News : मुंबईतील वांद्रे वरळी लिंकवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघाताता एका भरधान इनोव्हा कारने सहा वाहनांना भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी आहेत. गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेतील सर्व जखमींवर लीलावती हॉस्पिटल आणि भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (mumbai accident news speeding car hit several cars 3 dies 6 injured shocking accident)

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांचे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वरळीहून वांद्र्याच्या दिशेने एक भरधाव इनोव्हा कार जात होती. या इनोव्हा कारमध्ये सात जण प्रवास करत होते. ही इनोव्हा कार आधी सी लिंकवर असलेल्या मर्सिडीज कारला धडकली. त्यानंतर वांद्रे टोल नाक्याजवळ पोहोचताच तेथे आधीच अनेक वाहने उभी होती, त्यात इनोव्हाने तेथे उपस्थित असलेल्या तीन वाहनांना धडक दिली.या अपघातात मर्सिडीज आणि इनोव्हासह सहा गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा : EC सुनावणी: ‘अजित पवार गटाचा खोटेपणा, 20 हजार शपथपत्रात..’, पवार गटाच्या वकिलांचा मोठा आरोप

हे वाचलं का?

दरम्यान इनोव्हा कारची धडक इतकी भीषण होती की, सर्व वाहनांचा चक्काचूर झाला. आणि टोलनाक्याजवळ एकच आरडाओरडा सूरू झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर 6 जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यानंतर टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव इनोव्हा कार येत असताना हा अपघात झाला. त्याचवेळी इनोव्हा कारने मर्सिडीजला धडक दिली, या धडकेत इनोव्हा कारचा चालक जखमी झाला. त्यानंतर चालक पळून जात असताना सी लिंकवरील टोल प्लाझा येथे आधीच अनेक वाहने उभी होती. या वाहनांना देखील इनोव्हाने जोरदार धडक दिली.या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जणांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती मुंबई पोलिसांचे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : शाळा सुटली, मित्राने फूस लावली अन्… 5 मुलांचा शाळकरी मुलीवर गँगरेप

दरम्यान पोलीस सी लिंकवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची आधारे अपघाताच्या कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT