Mumbai Rain: मुंबईत पावसाचा प्रचंड धुमाकूळ; लोकल ट्रेनचं काय झालंय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई शहर आणि उपनगरात तुफान पाऊस कोसळत आहे.

point

मुंबई लोकलचे अपडेट सविस्तर वाचा...

point

महाराष्ट्राती कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

Mumbai Weather Forcast: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस बरसत आहे. आज (25 जुलै 2024) पुन्हा एकदा पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात तुफान पावसाला सुरूवात झाली आहे. पावसाचा हा जोर वाढल्याने लोकल प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर, रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. (mumbai rain local train update news 25 july 2024 latest weather forecast including maharashtra IMD)

ADVERTISEMENT

पावसाच्या जोरदार सरी मुंबई शहर आणि उपनगर परिसराला झोडपून काढत आहेत. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे आता मुंबईतील लोकलसेवेवर देखील याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत सर्व मार्गावरील लोकल सेवा सध्या उशिराने सुरु आहेत.

हेही वाचा : Pooja Khedkar: वाशिममधून निघालेली IAS Puja Khedkar कुठे झाली गायब?

मुंबई लोकलचे अपडेट सविस्तर वाचा...

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जोरदार पाऊस असल्याने गाड्यांचा वेग मंदावला असून कर्जत कसारा इथून येणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेस उशिराने आहेत. 

हे वाचलं का?

तसेच, पश्चिम रेल्वेच्या लोकल देखील 10 ते 15 मिनिटं उशीराने धावत आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल देखील 15 ते 20 मिनिटे उशिराने आहेत.  

हेही वाचा : Manoj Jarange: 'भाजप कधीच सत्तेत येऊ देऊ नका', जरांगेंचा मराठा समाजाला उघडउघड मेसेज!

पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.         

ADVERTISEMENT

महाराष्ट्राती कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

आज पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज या भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Dharmaveer Anand Dighe Divyang Yojana: मिळणार तब्बल 36 हजार, शिंदे सरकारची 'ही' कोणती योजना?

रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येथील सावित्री, कुंडलिका आणि अंबा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तसेच, ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT