Pooja Khedkar : 40 कोटींची संपत्ती असताना नॉन-क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र कसे मिळाले? पूजा खेडकरचे वडील म्हणाले...

मुंबई तक

ADVERTISEMENT

pooja khedkar non criminal layer certificate father dilip khedkar reaction on obc certificate
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आजतकला प्रतिक्रिया दिली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

समितीसमोर आम्ही आमचे म्हणणे मांडू.

point

माझ्या मुलीने कोणतीही चूक केलेली नाही.

point

माझ्याबद्दल या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत.

Pooja Khedkar Case Update : ओंकार वाबळे, पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर या दिवसेंदिवस वादात सापडत चालल्या आहेत.  पूजा खेडकर या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आयएएस झाल्या आहेत. यासाठी त्यांनी आठ लाख रुपये उत्पन्न असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. परंतु पूजा खेडकर हिचे वडील निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना 40 कोटींची संपत्ती दाखवली होती. त्यामुळे नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे. यावर पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी आजतकला प्रतिक्रिया दिली आहे.( pooja khedkar non criminal layer certificate father dilip khedkar reaction on obc certificate)  

पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी आजतकशी बातचीत केली आहे. यावेळी दिलीप खेडकर यांना पूजाने युपीएससीसाठी क्रिमी लेयर की नॉन-क्रिमी लेयरमधून अर्ज केला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दिलीप खेडकर म्हणाले, यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीसमोर आम्ही आमचे म्हणणे मांडू. कायदेशीर प्रक्रिया सुरू असेल तर त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही सर्व काही नियमानुसार केले आहे. यात गैर काहीच नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : Vidhan Sabha Opinion Poll : विधानसभेतही महायुतीला बसणार झटका, 'मविआ'चं काय? खळबळ उडवणारा सर्व्हे

'माझ्या मुलीने कोणतीही चूक केलेली नाही. एका महिलेने बसण्यासाठी जागा मागून कोणतीही चूक केलेली नाही. आमच्या मुलीचा छळ होत आहे. हे सर्व कोणीतरी मुद्दाम करत आहे, असे देखील दिलीप खेडकर यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचाही आरोप होतोय. या आरोपावर खेडकर म्हणाले, माझ्याबद्दल या चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. यामागे वेगवेगळी कारणे आहेत. यात अजिबात तथ्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आरोपावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले की, कोण खोटे बोलत आहे याबद्दल मला आत्ता बोलायचे नाही. सत्य कोण सांगतंय, वस्तुस्थिती कितीही असली तरी ते वेळ आल्यावर बाहेर येईलच, आम्ही केलं असलं तरी ते बाहेर येईल. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Anant Ambani Shubh Ashirwaad : PM मोदींपासून पवारांपर्यंत...अंबानींच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला कोण कोण पोहोचलं?

दिल्लीतील एम्सच्या चाचणीला पूजा खेडकर सहावेळा गैरहजर राहिल्या आहेत. यावर बोलताना दिलीप खेडकर म्हणाले, हे अर्ध सत्य आहे, यूपीएससी ही जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे. त्याच्यावर आजपर्यंत कोणी बोट ठेवलेले नाही? 20-25 लोकांचे वैद्यकीय मंडळ आहे. ही प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये होत नाही जिथे कोणी पेपर आणतो, सबमिट करतो आणि निवडला जातो. मला असे वाटत नाही की पेपर काही आहे, मला शारीरिकरित्या जावे लागेल. मग प्रमाणीकरण होते. कॅटची बाब वेगळी आहे. आम्ही अधिसूचनेला आव्हान दिले होते आणि त्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे देखील दिलीप खेडकर यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT