Mulund : ‘…तर गालावर वळ उठतील’, राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं
मुलुंडमध्ये गुजराती व्यक्तींनी मराठी महिला तृप्ती देवरुखकर यांना ऑफिससाठी जागा देण्यास नकार दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी इशारा दिला. मनसे कार्यकर्त्यांनाही राज यांनी आदेश दिलेत.
ADVERTISEMENT
Raj Thackeray Tweet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा दम भरला. मुलुंडमध्ये गुजराती व्यक्तीने मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास नकार दिल्यानंतर राज यांनी इशारा दिला. विशेष म्हणजे या प्रकारानंतर राज ठाकरेंनी शिंदे सरकारलाही सुनावलं आहे. (Raj Thackeray First Reaction On mulund Video)
ADVERTISEMENT
तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास गुजराती पिता-पुत्राने नकार दिला. इतकंच नाही, तर गैरवर्तनही केलं. महिलेने व्हिडीओतून व्यथा मांडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. या घटनेमुळे राजकारणही तापलं. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाऊन गुजराती पिता-पुत्राला माफी मागायला लावली.
मराठी माणसाला जागा देण्यास नकार, राज ठाकरेंनी काय दिला इशारा?
” मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला”, असं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> पंकजा मुंडेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! “मराठी असल्याने मलाही मुंबईत घर नाकारलं”
“हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे”, असा इशारा राज ठाकरेंनी या घटनेनंतर दिला.
मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 29, 2023
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?
पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
या घटनेनंतर मुलुंड पोलिसांनी तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गुजराती पिता-पुत्राविरुद्ध मुलुंड पोलिसांनी भादंवि कलम 341, 323, 504 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. प्रवीण ठक्कर आणि नीलेश ठक्कर अशी त्यांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT