Ratan Tata : पारशी समुदायात गिधाडांसाठी ठेवतात मृतदेह, रतन टाटांवर विद्युतदाहिनीत का झाले अंत्यसंस्कार?

प्रशांत गोमाणे

Ratan Tata Last Rites : रतन टाटा हे पारशी होते, तरीही पारशी रितीरिवाजांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार नाहीयेत, तर रतन टाटा यांच्यावर वरळीतील विद्युत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. खरं तर पारशी समाजाची अंत्यसंस्काराची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे पारशी समाजात अंत्यसंस्कार कसे होतात? हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

रतन टाटांवर विद्युतदाहिनीत का झाले अंत्यसंस्कार?
ratan tata last rites parsi community last rites rituals in tower of silence with vultures
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रतन टाटा हे पारशी होते.

point

पारशी रितीरिवाजांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार नाही

point

रतन टाटा यांच्यावर वरळीतील विद्युत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Ratan Tata Last Rites :  प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रतन टाटा हे पारशी होते, तरीही पारशी रितीरिवाजांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार नाहीयेत, तर रतन टाटा यांच्यावर वरळीतील विद्युत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. खरं तर पारशी समाजाची अंत्यसंस्काराची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे पारशी समाजात अंत्यसंस्कार कसे होतात? हे जाणून घेऊयात. (ratan tata last rites parsi community last rites rituals in tower of silence with vultures) 

हिंदू धर्मात ज्याप्रमाणे मृतदेह जाळला जातो त्याचप्रमाणे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात मृतदेह दफन केला जातो. पण, पारशी लोक प्रियजन मरण पावल्यानंतर त्यांच्या देहाला ज्या जागी निसर्गाच्या स्वाधीन करून टाकतात त्या जागेला 'टॉवर ऑफ सायलेन्स' (शांततेचा मनोरा) म्हटले जाते. ही प्रथा प्राचीन काळापासून पारशी समुदायात चालत आली आहे. याला 'दखमा' असे म्हणता. 

हे ही वाचा : Ratan tata Net worth : कोट्यवधींची संपत्ती मागे सोडून गेले रतन टाटा, किती होतं नेटवर्थ?

'टॉवर ऑफ सायलेन्स' म्हणजे काय? 

'टॉवर ऑफ सायलेन्स'ला 'दखमा' म्हणतात. टॉवर ऑफ सायलेन्स ही एक गोलाकार पोकळ इमारतीच्या रूपात आहे. या इमारतीवर मृत शरीर उद्यड्यावर सूर्याच्या किरणांसमोर ठेवले जाते. त्यानंतर मृतदेह गिधाडे, गरुड आणि कावळे खातात. गिधाडे मृतदेह खाणे हा देखील पारशी समाजाच्या परंपरेचा एक भाग आहे. या अंत्यसंस्कार प्रक्रियेला दोखमेनाशिनी म्हणतात. तसेच पारशी धर्मात मृतदेह जाळणे किंवा दफन करणे हे निसर्ग प्रदूषित मानले जाते.

मृतदेह दहन आणि दफन का करत नाही? 

पारशी समाजात मृतदेह उघड्यावर सोडण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. वास्तविक, पारशी समाजात असे मानले जाते की मृतदेह अपवित्र असतो. पारशी लोक पर्यावरण प्रेमी आहेत, म्हणून ते शरीर जाळत नाहीत कारण यामुळे अग्नि तत्व अशुद्ध होते. त्याच वेळी, पारशी लोकांमध्ये, मृतदेहांवर अंत्यसंस्कार देखील केले जात नाहीत कारण ते पृथ्वी प्रदूषित करते आणि पारशी मृतदेह नदीत तरंगवून देखील अंतिम संस्कार करू शकत नाहीत कारण ते पाण्याचे घटक प्रदूषित करते. पारशी धर्मात पृथ्वी, जल आणि अग्नी या घटकांना अतिशय पवित्र मानले जाते. पारंपारिक पारशींचे म्हणणे आहे की, मृतदेह जाळून अंत्यसंस्कार करणे धार्मिक दृष्टिकोनातून योग्य नाही.

हे ही वाचा : Ratan Tata Death: उद्योगपती रतन टाटा गेल्याने जगभरात शोककळा, राजकीय नेत्यांकडून हळहळ!

हे वाचलं का?

    follow whatsapp