Ratan Tata Passed Away: भारताने गमावला दिलदार उद्योगपती, रतन टाटांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्योजक रतन टाटांचं निधन
उद्योजक रतन टाटांचं निधन
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्योजक आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचं निधन

point

वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटांनी घेतला अखेरचा श्वास

point

रतन टाटा यांच्यावर मागील काही दिवसांपासून सुरू होते उपचार

Breaking News: मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज (9 ऑक्टोबर) निधन (Ratan Tata Passed Away) झाले. ते 86 वर्षांचे होते. टाटा सन्स या देशातील सर्वात मोठे व्यावसायिक ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वार्धक्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या.  उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

रतन टाटांचं निधन नेमकं कशामुळे?

  • रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार करण्यात आले
  • ब्रीच कॅन्डी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील,चौथा मजला हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव होता
  • उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर रतन टाटा यांना, ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने खूप उंची गाठली. रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 2012 पर्यंत ते या पदावर होते. त्यांनी 1996 मध्ये टाटा सर्व्हिसेस आणि 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सारख्या कंपन्यांची स्थापना केली.

हे ही वाचा>>  Ratan Tata : हेवा वाटेल असं यश मिळवलं, मग प्रेमातच का ठरले अपयशी?

रतन टाटा यांच्याविषयी संक्षिप्त माहिती 

  1. 28 डिसेंबर 1937 साली जन्म झालेले रतन टाटा हे अविवाहित होते.
  2. रतन टाटा यांचे 3800 कोटींचे व्यावसायिक साम्राज्य
  3. आपल्या संपत्तीतील 65 टक्के संपत्ती रतन टाटा यांनी समाजकार्यासाठी दान दिली
  4. या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटा यांचा आदराने उल्लेख केला जातो
  5. रतन टाटा यांनी 1961 साली टाटा समूहात काम सुरू केलं
  6. टाटा स्टील या कंपनीत शॉप फ्लोअरवर त्यांनी प्रथम काम केलं

रतन टाटा यांच्याबाबत काही विशेष माहिती

  • आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करून, रतन टाटा यांचा गौरव करावा या मागणीने मोठा जोर पकडला होता
  • हायकोर्टात या मागणीसाठी चक्क याचिकाही दाखल झाली होती
  • दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता तरीही ही मोहीम जोरात सुरू होती.
  • मात्र, स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन, हे सर्व थांबवा... अशी जाहीर विनंती केली होती
  • 2008 मधे रतन टाटा यांचा आपल्या देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्वविभूषण प्रदान करून गौरविण्यात आलं होतं.
  • ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑर्डर ऑफ ब्रिटिश या आंतरराष्ट्रीय सन्मानानंही, रतन टाटा यांचा गौरव करण्यात आला होता

रतन टाटा यांचे वारसदार म्हणून 4 नावं चर्चेत

  1. रतन टाटा यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांचे चुलतभाऊ नोएल टाटा
  2. टाटा समूहातील अनेक कंपन्यांतील एक महत्वाचे नाव असलेल्या 34 वर्षीय माया टाटा
  3. स्टार बाजारचे प्रमुख 32 वर्षीय नेविल टाटा
  4. इंडियन हॉटेलचे प्रमुख 39 वर्षीय लीह टाटा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT