Women Reservation Bill : आजचा दिवसही ऐतिहासिक, 27 वर्षांची प्रतीक्षा संपणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Women Reservation Bill will be tabled in the Rajya Sabha after its approval in the Lok Sabha Narendra Modi government decision
Women Reservation Bill will be tabled in the Rajya Sabha after its approval in the Lok Sabha Narendra Modi government decision
social share
google news

Women Reservation Bill : नव्या संसद भवनाच्या पहिल्याच दिवशी भव्यदिव्यतेच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. त्यानंतर या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा (Opposition support) दर्शवत विधेयकाचे स्वागतही करण्यात आले. विरोधकांनी विधेयकाचे समर्थन करत त्याची अमलबजावणी तात्काळ लागू करावी अशीही मागणी केली. लोकसभेतील (Loksabha) मंजूरीनंतर आता हेच विधेयक राज्यसभेत (Rajysabha) मंजूरीसाठी मांडले जाणार आहे. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मात्र देशासाठी आणि महिलांसाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. गेल्या 27 वर्षापासून हे बिल रखडले होते. नरेंद्र मोदी यांनी हे बिल लोकसभेत मंजूर केल्यानंतर विरोधकांनीही त्याला पाठिंबा दर्शवत हे विधेयक देशात तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. (women reservation bill will be tabled rajyasabha after approval loksabha, narendra Modi government decision)

ADVERTISEMENT

विधेयक आज राज्यसभेत

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आजचा दिवस देशासाठी महत्वाचा असणार आहे. देशातील महिलांना या विधेयकामुळे वेगळी चालना मिळणार आहे. त्यामुळे या विधेयकाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. महिलांना राजकीय महत्व प्राप्त होणार असून महिलांच्या विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे.

हे ही वाचा >> ‘त्या’ विधेयकाचे स्वागतच पण…, ‘सामना’तून सरकारच्या वर्मावर बोट

चर्चेसाठी साडेसात तासांची वेळ

देशाची नवी संसदेच्या उद्घाटनानंतर त्या नव्या संसदेची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाची लोकसभेत घोषणा केल्यानंतरही जोरदार चर्चा झाली. त्याचे स्वागत करत अनेक सवालही उपस्थित करण्यात आले. त्यानंतर आज हेच विधेयक राज्यसभेत मंजूरीसाठी ठेवण्यात येणार असल्याने त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. हे बिल राज्यसभेत मांडल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी साडेसात तासांची वेळ देण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

चर्चेनंतर विधेयक मंजूर

महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेने मंजूर केले आहे. या अशा परिस्थितीत आजचा दिवस महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यसभेत यावर काय चर्चा होणार हेही त्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा >> Sanjay Raut : गटारं, अंधभक्त, नेहरू… PM मोदींना डिवचलं; राऊत असं काय बोलले?

ओबीसी महिलांना कोटा द्या

महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांचाही पाठिंबा मिळला आहे. मात्र, यामध्ये ओबीसी महिलांना कोटा देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे. त्याची अंमलबजावणी कधी होणार हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT