Eknath Shinde:’…याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका’, शिवसेना (UBT) शिंदेंवर का भडकली?
कळवा रुग्णालयात 27 रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये. एकनाथ शिंदेंवरही तिखट शब्दात टीका केलीये.
ADVERTISEMENT
Kalwa Hospital : ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल 27 रुग्णांचा मृत्यू झाला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरले. त्यावर शिंदे म्हणाले की, राजकारण करू नका. शिंदेंच्या याच भूमिकेवरून शिवसेनेने (युबीटी) त्यांना लक्ष्य केलंय. नाटक करून नका, असा चिमटा काढतानाच शिवसेनेने आरोग्य मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केलीये.
ADVERTISEMENT
10 ऑगस्ट रोजी 5, तर 13 ऑगस्ट रोजी तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी 4 रुग्ण कळव्यातील रुग्णालयात दगावले. या घटनेनं खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन केले. पण, यावर शिवसेनेने तिखट प्रतिक्रिया दिलीये.
सामनात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात सुरुवातालीच एकनाथ शिंदेंना खडेबलो सुनावेलत. “13 ऑगस्टच्या रविवारी एका रात्रीत या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्युकांडाने महाराष्ट्राला हादरे बसले, पण ठाणे-कळवा ज्यांचे ‘होम ग्राऊंड’ आहे त्या मुख्यमंत्र्यांना ते जाणवायला बहुदा दोन दिवस लागले.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
वाचा >> शरद पवारांना मोठी ऑफर? काँग्रेस, शिवसेना (UBT) टेन्शनमध्ये, काय शिजतंय?
“सोमवारी (14 ऑगस्ट) रात्री त्यांचे पाय कळवा रुग्णालयाला लागले. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते म्हणे महाबळेश्वर येथे आराम घेत होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीस जपा, हवा तिथे, हवा तेवढा आराम करा, पण आपण जनतेच्या मदतीला कसे लगेच धावून जातो याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका”, असे खडेबोल अग्रलेखातून शिवसेनेने सुनावलेत.
‘अश्रू सुकल्यानंतर पोहोचले शिंदे’
“ज्या हेलिकॉप्टरने मदतीच्या ठिकाणी तत्काळ गेल्याचे तुम्ही भासविता त्याच हेलिकॉप्टरने महाबळेश्वर येथून कळवा येथे यायला तुम्हाला किती वेळ लागला असता? मृत रुग्णांच्या दुर्दैवी नातेवाईकांचे अश्रूही पुसता आले असते. परंतु हे अश्रू सुकल्यावर मुख्यमंत्री तेथे पोहोचले”, असा टोलाही शिवसेनेने सामना अग्रलेखातून लगावला आहे.
ADVERTISEMENT
बीएमसी कोविड घोटाळ्यावरून शिंदेंना धरलं धारेवर
अग्रलेखात पुढे म्हटलंय की, “मुख्यमंत्री असेही म्हणाले की, विरोधकांनी या घटनेचे राजकारण तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करू नये. अर्थात हे बोलताना त्यांनी स्वतःही आरशात पाहायला हवे. मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यांच्या नावाने तुमचे सरकार भंपक राजकारण करीत आहे, खोटे गुन्हे दाखल करीत आहे. कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत झालेल्या 18 मृत्यूंवर विरोधकांनी आवाज उठविला, त्यावरून सरकारला धारेवर धरले तर त्याला राजकारण कसे म्हणता येईल?”, असा मुख्यमंत्री शिंदेंना करण्यात आलायं.
ADVERTISEMENT
तानाजी सावंताच्या राजीनाम्याची मागणी
“1986 मध्ये जे.जे. रुग्णालयातील 14 मृत्यूंवरून तत्कालीन आरोग्य मंत्री भाई सावंत यांनी राजीनामा दिला होता. ते मृत्यू दोन महिन्यांतील होते. कळवा रुग्णालयातील 18 मृत्यू 24 तासांतील आहेत. त्यामुळे आताच्या ‘सावंतां’नीही राजीनामा द्यायला हवा. ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करायला हवे. कारण प्रश्न कळव्यातील मृत्युकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे. आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला!”, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.
वाचा >> “मोदींची अजित पवारांना अट! शरद पवार आले तरच मुख्यमंत्रीपद”
“मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय आरोग्यदेखील बिघडलेलेच आहे. ते आणखी बिघडावे यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. ते सुधारण्यासाठी जनतेलाच 2024 मध्ये मोठी ‘शस्त्र्ाक्रिया’ करावी लागणार आहे”, असे आवाहन ठाकरेंच्या शिवसेनेने सामनातून केलंय.
ADVERTISEMENT