कोण आहे Shrushti Deshmukh?; IAS Tina Dabi नंतर इंटरनेटवर तुफान चर्चा

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Who is Shrushti Deshmukh After IAS Tina Dabi She is Very Famous on Social Media
Who is Shrushti Deshmukh After IAS Tina Dabi She is Very Famous on Social Media
social share
google news

IAS : Tina Dabi vs Srushti Deshmukh : राजस्थानच्या IAS अधिकारी टीना दाबी (IAS Tina Dabi) यांच्याबद्दल तुम्ही खूप ऐकलं आणि वाचलं असेल. टीना दाबी सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांचे हजारो फॉलोअर्सही आहेत. त्यांची प्रत्येक स्टोरी प्रचंड व्हायरल होत असते. पण, आता टीना दाबींच्या नावानंतर आणखी एक नाव तुफान चर्चेत आहे. टीना दाबींप्रमाणेच मध्य प्रदेशातील एका IAS अधिकारीच्या नावाने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. या IAS नरसिंगपूर जिल्ह्यातील गदरवाडा तहसीलच्या एसडीएम आहेत. सृष्टी देशमुख (IAS Srushti Deshmukh) असं त्यांचं नाव आहे.  (Who is Shrushti Deshmukh After IAS Tina Dabi She is Very Famous on Social Media)

ADVERTISEMENT

IAS टीना दाबींनंतर सृष्टी देशमुख यांच्या नावाचा दबदबा

IAS सृष्टी देशमुख यांचे ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स आहेत. ते दररोज त्यांच्या पोस्टची वाट पाहत असतात. एसडीएम पदावर कार्यरत असलेल्या IAS सृष्टी देशमुख या गदरवाडा तहसीलमध्ये तैनात आहेत.

वाचा : Ram Mandir Ayodhya: रामलल्लाच्या संपूर्ण मूर्तीचा पहिला फोटो आला समोर, मनमोहक हास्य अन्…

इंजिनीअर ते IAS अधिकारी… सृष्टी देशमुख यांचा यशस्वी प्रवास!

सृष्टी देशमुख यांचा जन्म 1995 मध्ये झाला. त्यांच्या वडीलाचं नाव जयंत देशमुख तर, आईचं नाव सुनीता देशमुख आहे. सृष्टी मूळच्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या आहेत परंतु त्यांचा जन्म कस्तुरबा नगर, भोपाळ, मध्य प्रदेशचा आहे. सृष्टी यांनी कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, BHEL, भोपाळ येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. तर 12वी बोर्ड परीक्षेत त्यांनी 93.4 टक्के गुण मिळवले होते.

हे वाचलं का?

वाचा : Lok Sabha 2024 : भाजपला ‘या’ 129 जागांची चिंता! मोदी पुन्हा सत्तेत कसे येणार?

सृष्टी यांना IIT मधून इंजिनीअरिंग करायचे होते पण त्या आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यात अयशस्वी ठरल्या. त्यानंतर केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक करण्यासाठी भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी प्रवेश केला. केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवल्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

सृष्टी सांगतात की, ‘यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासोबतच इंजिनीअरिंगचा अभ्यास करणं खूप कठीण होतं. तिचा जास्तीत जास्त वेळ आणि एनर्जी यूपीएससीच्या तयारीसाठी खर्च होत असे. इंजिनीअरिंगच्या सेमिस्टर परीक्षेची त्या एक ते दीड महिना तयारी करायच्या.’

ADVERTISEMENT

सृष्टी यांचं नाव चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी वयाच्या 23 वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी ठरवलं होतं की, यूपीएससी परीक्षेचा पहिलाच प्रयत्न हा शेवटचा असला पाहिजे. 2018 च्या UPSC परीक्षेत त्यांनी 5 वा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केलं. त्या त्यांच्या बॅचच्या महिला टॉपर होत्या. त्यांची मार्कशीट अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होते. सृष्टी यांनी UPSC मुख्य परीक्षेत 895 आणि मुलाखतीत 173 गुण मिळवले. त्यांचे एकूण गुण 1068 होते.

ADVERTISEMENT

वाचा : सोलापुरात PM Modi च्या डोळ्यात पाणी, कंठ दाटला; म्हणाले, “लहानपणी…”

सृष्टी देशमुख यांचे पतीही आहेत IAS अधिकारी!

IAS सृष्टी जयंत देशमुख यांचे पती देखील IAS आहेत. डॉ.नागार्जुन बी गौडा असे त्यांचे नाव आहे. प्रशिक्षणादरम्यान सृष्टी मसुरीमध्ये नागर्जन यांना भेटली. यादरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि हे IAS कपल लग्नबंधनात अडकले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT