‘तुम्ही बेजबाबदार वक्तव्य का करता?’, पॅलेस्टाईनच्या वक्तव्यावरून शरद पवार-भाजपचे युद्ध

मुंबई तक

ADVERTISEMENT

why do you make irresponsible statements bjp angry question pawar on Palestine statement
why do you make irresponsible statements bjp angry question pawar on Palestine statement
social share
google news

Sharad Pawar : इस्लायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे (Israel-Palestine War) त्याचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. या युद्धामुळे आता दोन गटात जगाची विभागणी झाल्यासारखी झाली आहे. समर्थन आणि विरोध असे दोन गट पडल्यामुळेच आता भारतातील राजकारणही ढवळून निघाले आहे. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यांच्याबरोबर फोनवर चर्चा करुन भारत या युद्धात इस्रायलच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे देशातील काही संघटना व राजकीय पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. हे सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनीही पॅलेस्टाईनच्या बाजू घेत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

ADVERTISEMENT

भारताची भूमिका होती स्पष्ट

या युद्धाबद्दल बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, जिथे हे युद्ध सुरु आहे, तेथील जमीन ही पॅलेस्टिनी नागरिकांची आहे. त्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आणि त्यानंतर इस्त्रायल देशाचा जन्म झाला आहे. मात्र त्या वादात आपल्या पडायचे नसले तरी आपल्या भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत केली होती. तर आता त्या विरोधात जात आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र इस्त्रायलची बाजू घेतली आहे. यामध्ये त्यांनी पॅलेस्टाईनकडे दुर्लक्ष केले आहे. नरेंद्र मोदी यांनी तशी भूमिका मांडली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्याबाबतची भूमिका स्पष्ट असल्याचे मतही त्यांनी मांडले.

हे ही वाचा >> Manoj Jarange Patil: ‘आरक्षणासाठी पदाचा-सत्तेचा विचार करू नये’, जरांगे-पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

शरद पवारांवर निशाणा

राष्ट्रवादीची भूमिका शरद पवारांनी मांडताना त्यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने आपले मत मांडले. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्यावर सोशल मीडियावरून त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार यांनी इस्त्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या पंतप्रधानांनी भूमिका मांडल्यानंतर त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे त्यांची ही टीका अस्वस्थ करणारी असते असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी दहशतवादावर बोलत त्यांच्याविरोधात आपण निषेधच केला पाहिजे अशी टीकाही त्यांनी शरद पवारांवर केली आहे.

 

ADVERTISEMENT

मतांचे राजकारण नको

शरद पवार यांच्यावर टीका करताना पीयूष गोयल यांनी शरद पवार मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. तरीही इतक्या बेजबाबदार वक्तव्य करत असतील तर ते योग्य नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. शरद पवार यांच्यावर आता भाजपमधील नेत्यांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या वक्त्वव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना ते म्हणाले की, इस्त्रायल-पॅलेस्टाईन वादात भारताने आपली भूमिका कधीच बदलली नाही. मात्र त्यावेळी आपल्या देशाकडून दहशतवादाला जोरदार विरोध करण्यात आला.

ADVERTISEMENT

 

आताही ज्या इस्त्रायलमध्ये निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. त्या घटनेचा सगळ्या जगाने निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे भारतानेही तेच केले. त्यामुळे शरद पवार यांनीही तेच करायला हवे होते, कारण दहशतवाद काय असतो ते मुंबईनेही अनुभवले आहे. त्यामुळे शरद पवारांना माझी विनंती आहे की, फक्त मतांच्या राजकारणासाठी विचार न करता दहशतवादाविरोधात तुम्ही त्यांचा निषेध व्यक्त करा असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >>Manoj Jarange Patil: ‘राजकारण्यांचे डाव उधळून लावले’, जरांगे पाटलांनी नेमकं ते सांगितलं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT