Gadar 2 : ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ म्हणाला अन् तरुणाने गमावला जीव; मित्रांनीच केली हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chhattisgarh gadar 2 murder crime
Chhattisgarh gadar 2 murder crime
social share
google news

Chhattisgarh Murder : देशभरात गदर-2 (Gadar 2) चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याबाबत अनेक गोष्टी चर्चेला आल्या. मात्र आता गदर-2 चित्रपटाबाबत एक धक्कादायर बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये (Chhattisgarh Durg District) गदर-2 बघून आल्यानंतर युवकाने हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, त्या घोषणा दिल्यानंतर मात्र त्याच्या मित्राने रागाने मारहाण करुन त्याची हत्या (Murder) केली. ही घटना खुर्सीपार पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली असून आयटीआयच्या मैदानात युवकाची हत्या करण्यात आली. (chhattisgarh murder Gajar 2 Hindustan Zindabad Slogans gang killed boy)

ADVERTISEMENT

 गदर-2 मधील ते दृश्य

आयटीआयच्या मैदानात शनिवारी सायंकाळची वेळ असताना दोन युवक मोबाईलवर गदर 2 चित्रपट पाहत होते. चित्रपट पाहत असताना सिनेमातील एका दृश्यावर मलकीत सिंहने प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मैदानावर थांबलेल्या एका गटाने मलकीत सिंहवर जोरदार हल्ला केला. त्यावेळी मलकीतला लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्याला बेशुद्ध केले.

हे ही वाचा >> Pusesavali Satara : पुसेसावळीतील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला तो कोण?

घोषणा दिल्या अन्

मलकीतला मारहाण करण्यात आल्याचे कुटुबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मैदानाकडे धाव घेतली. त्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. डॉक्टरांनी रायपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले मात्र पहाटे चार वाजता मलकीतचा मृत झाला. त्याच्या या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

टोळक्याने लाथा बुक्या घातल्या

आयआयटी मैदानावर गदर 2 हा चित्रपट पाहत असताना मलकीतने हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषा दिल्या होत्या. त्यावेळी त्याच मैदानावर एका गटातील काही लोकं दारु पित बसले होते. त्याचवेळी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा त्यांना आवडल्या नसल्याने मलकीत सिंह बरोबर त्यांनी वाद काढला. त्यांनी त्यांची क्रुरपणे हत्या घडवून आणण्यात आली.

हे ही वाचा >> Palghar Crime : जादूटोणा… महिलेवर पतीच्याच 5 मित्रांनी केला अनेक वेळा बलात्कार

आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न

मृत मलकीत सिंहच्या कुटुंबीयांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील आरोपींना काँग्रेसकडून वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मृत मलकीतच्या आई वडील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर दुर्ग जिल्ह्याचे खासदार भाजपचे खासदार विजय बघेल आणि माजी आमदार प्रेम प्रकाश पांडेय यांनी घटनास्थळी पोहचत पोलिसांवर त्यांनी दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

शीख समाजानेही दिला इशारा

मलीकत सिंह याची हत्या झाल्यानंतर आता शीख समाजानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या मलकीत सिंहची हत्या झाल्यानंतर आता कुटुंबीयांकडून 50 लाखांची नुकसान भरपाई मागण्यात आली असून आमच्य मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचाही त्यांनी इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT