दाऊदचा भाचा अलीशाह पारकरचा ‘तो जबाब’ ज्यामुळे अडकले नवाब मलिक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ईडीला (Enforcement Directorate) महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एक जबरदस्त पुरावा मिळाला. त्याचं कारण आहे दाऊदचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर याच्या जबाबात ईडीला हा पुरावा मिळाला. ईडीने अलीशाहची चौकशी केली होती. या जबाबात जे अलीशाह पारकर म्हणाला त्याचमुळे गोवावाला कपाऊंडविषयी आणि नवाब मलिक हे अडकले, ईडीने त्यांना अटक केली.

ADVERTISEMENT

दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर हा मुंबईत राहतो. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आमि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. इंडिया टुडेनेच ही बातमी दिली होती. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.

काय म्हणाला अलीशाह पारकर?

हे वाचलं का?

“माझी आई दिवंगत हसीना पारकर ही गृहिणी होती. उदरनिर्वाहासाठी ती छोटे-मोठे आर्थिक व्यवहार करत होती. तिच्या मालकीच्या मालमत्तेतून तिला भाडे मिळत असे. साधारण ३ ते ५ लाख रूपये भाडे तिला मिळत होतं. माझी आई (हसीना पारकर) रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची. दाऊदची बहीण अशीही तिची ओळख होती. त्यामुळे मालमत्तेशी संबंधित वादही ती मिटवत होती.”

“दाऊद इब्राहिम (मामा) आणि माझी आई (हसीना पारकर) यांच्यातले संबंध हे चांगले होते. ते वारंवार एकमेकांशी फोनवरून बोलत होते. माझी आई तिच्या मृत्यूपर्यंत दाऊद आणि हसीना पारकर हे आर्थिक व्यवहार करत होते.”

ADVERTISEMENT

माझ्याकडे फारसा तपशील नाही मात्र मला हे माहित आहे की माझी आई हसीना पारकर दाऊद इब्राहिमच्या म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेवर लक्ष ठेवत होती. माझी आजी अमीना बी कासकर यांच्या नावावर या मालमत्ता होत्या. SAFEMA, NDPSA मुंबई २००८ मध्ये संलग्न केलं होतं. त्यानंतर इकबाल कासकर (माझे काका) यांनी दाऊद इब्राहिम म्हणजेच माझ्या मामाच्या मालमत्तेचा ताबा घेतला आणि त्यांची देखभाल सुरू केली.

ADVERTISEMENT

माझ्या आईचे (हसीना पारकर) दोन प्रमुख सहकारी होते. एक होता सलीम पटेल, दुसरा होता खालिद जो गाडी चालवत होता. शमीन म्हणून एकजण होता तो देखील माझ्या आईसाठी काम करत होता. सलीम पटेल हा कांद्याची खरेदी विक्री करत होता आणि मालमत्तेच्या व्यवहारातही होता. माझी आई हसीना पारकर आणि सलीम पटेल यांनी कुर्ल्यातील गोवावाला बिल्डिंगचा वाद मिळवला होता. तिथे ऑफिस सुरू करण्यात आलं आणि कंपाऊंडच्या काही भागावर ताबा मिळवला गेला होता.

माझ्या आईच्या वतीने या मालमत्तेशी संबंधित वाद काय होता ते माहित नाही. मात्र सलीम पटेल त्या ऑफिसमध्ये बसून कामकाज पाहात असे. त्यानंतर माझी आई हसीना पारकरने तिच्या ताब्यात असलेला भाग नवाब मलिक यांना विकला होता. नवाब मलिक यांनी माझी आणि सलीम पटेल यांना नेमका किती मोबदला दिला ते मला माहित नाही असंही अलीशाह याने सांगितलं. मात्र नेमकं हेच वक्तव्य ईडीला नवाब मलिक यांच्या विरोधात मोठा पुरावा मिळाला. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT