Crime : अनैतिक संबंधातून पतीचा काढला काटा, बायकोने प्रियकरासह मिळून रचला कट
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बायकोनेच प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात पती जेलमध्ये गेला होता, त्याच्याच भावासोबत बायकोचं जुळलं होतं.
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदा (Banda) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बायकोनेच प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात पती जेलमध्ये गेला होता, त्याच्याच भावासोबत बायकोचं जुळलं होतं.आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर ज्यावेळस त्याला या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली होती. त्यावेळेस बायकोनेच प्रियकरासह मिळून त्याची हत्या केली होती. नेमकी ही संपूर्ण घटनाक्रम काय आहे, हे जाणून घेऊयात. (illicite relationship wife and her boy friend killed husband banda uttar pradesh crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या घटनेत हत्या झालेल्या पतीचे नाव बालकरण पटेल आहे. या बालकरण पटेलने 2005 ला गावातील एका व्यक्तीची हत्या केली होती. या हत्येनंतर बालकरण पटेल जेलमध्ये गेला होता. पटेल जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या बायकोचे मृत व्यक्तीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधाची बालकरण पटेलला अजिबात कल्पना नव्हती. मात्र ज्यावेळेस बालकरण पटेल जानेवारी 2023 मध्ये जेलबाहेर आला, त्यावेळेस त्याला या अनैतिक नात्याची माहिती मिळाली होती.
हे ही वाचा : Crime: 27 वर्षाच्या मुलाची हत्या,विटेने ठेचून घेतला जीव,कारण ऐकून हादरून जालं
बालकरण पटेलला या प्रकाराची माहिती मिळताच त्याने बायकोच्या या नात्याला विरोध करायला सुरुवात केली होती. तसेच या नात्यावरून दोघांमध्ये भांडण देखील व्हायची. याच भांडणाला कंटाळून बायकोने प्रियकराला त्याच्या भावाच्या हत्येचा बदला घेण्याची आयडिया दिली. कारण बालकरणने त्याच्या भावाची हत्या केली होती. त्यानुसार बायको आणि प्रियकराने बालकरणच्या हत्येचा कट रचला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ठरल्यानुसार बायकोने प्रियकर आणि त्याच्या साथिदाराला घरी बोलावले. या दोघांनी मिळून बालकरण पटेलवर गोळी झाडून त्याची हत्या केली. या हत्येनंतर पोलिसांना पुरावा सापडू नये, यासाठी घराची साफसफाई करण्यात आली. या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी घटनास्थळी झालेली साफसफाई पाहून पोलिसांना बायकोवरच संशय बळावला होता. पोलिसांनी बायकोची चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. मात्र यानंतर कॉल डिटेल्स तपासले असता महिलेचे पितळ उघडं झाले होते.
हे ही वाचा : Chandrayaan-3 नंतर ISRO चं लक्ष सूर्यावर, कशी असेल Aditya-L1 मोहीम?
महिलेच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला होता. कारण हत्येचा दिवशी कॉल करून महिलेने प्रियकर आणि त्याच्या साथिदाराला घटनास्थळी बोलावले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने हत्येची कबूली दिली.दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी बाकोसह तिचा प्रियकर आणि मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT