नवऱ्याच्या मृत्यूचा धसका घेत पत्नीचं सुसाईड, अंत्यसंस्कारानंतर वेगळंच सत्य आलं समोर
एका खाजगी रूग्णालयातील गच्चीवर एअर कंडिशनद्वारे गॅस भरत असताना स्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते.
ADVERTISEMENT
Crime News : ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका खाजगी रूग्णालयात स्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले होते. स्फोटात आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच एका पत्नीने आत्महत्या केली होती. मात्र या महिलेच्या आत्महत्येनंतर आता वेगळचं सत्य समोर आले आहे. ज्या नवऱ्याच्या मृ्त्यूची बातमी एकूण महिलेने आत्महत्या केली होती, तोच आता जिवंत सापडला आहे. त्यामुळे खोरधा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. (man thought to have died found undergoing treatment at hospital odisha story)
ADVERTISEMENT
एका खाजगी रूग्णालयातील गच्चीवर एअर कंडिशनद्वारे गॅस भरत असताना स्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. हा स्फोट इतका भयानक होता की जखमींची ओळख देखील पटवता येत नव्हती. मात्र तरी देखील प्राथमिक माहितीच्या अहवालानुसार, एका मृतदेहाची सामंतराय अशी ओळख पटली होती. या ओळखीनुसार त्याच्या कुटुंबियांकडे मृतदेह सूपूर्द केल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी आपल्या पतीच्या निधनाची बातमी ऐकताच, घटनेचा धसका घेऊन पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
हे ही वाचा : मॉडेल दिव्याच्या हत्येची ‘ती’ शेवटची रात्र, पोलिसांनी सगळा घटनाक्रमच दाखवला
मृत व्यक्ती झाला जिवंत
या आत्महत्येच्या घटनेनंतर गुरुवारी सायंकाळी उपचार घेत असलेल्या ज्योती रंजन मल्लिक नावाच्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांशी बोलताना त्याने तो मल्लिक नसून दिलीप सामंत राय असल्याचा दावा केला होता.
हे वाचलं का?
‘या घटनेत जखमी झालेले चार जण हे हॉस्पिटलचे नियमित कर्मचारी नसून आउटसोर्सिंग एजन्सीचे कर्मचारी होते. स्फोटानंतर एजन्सीच्या एका कर्मचाऱ्याने त्यांना ओळखले, ज्याच्या आधारे आम्ही रेकॉर्ड केले आणि पीडितांच्या नातेवाईकांनीही त्यांची ओळख पटवली.’दिलीप सामंत राय नावाच्या व्यक्तीचा 30 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि प्रोटोकॉलनुसार आम्ही पोलिसांना कळवले आणि त्याच्या कुटुंबीयांनीही संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. असे हॉस्पिटलच्या सीईओ स्मिता पाधी म्हणाल्या आहेत.
मानसोपचातज्ज्ञांनी केली तपासणी
दरम्यान या घटनेत उपचार घेत असलेल्या व्यक्तीने दिलीप सामंत राय असल्याचा दावा केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे या व्यक्तीची योग्य ओळख पटवण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेण्यात आली होती. मानसोपचारतज्ज्ञ अमृत पट्टोजोशी यांना रुग्णाची मानसिक स्थिती तपासण्याचे काम सोपविण्यात आले होते. सामंतराय यांच्या कुटुंबीयांची नावे विचारली असता, रुग्णाने अचूक उत्तर दिले. त्यावेळी दोन्ही व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. एक डॉक्टर म्हणून मला रुग्ण दिलीप असल्याची 90 टक्के खात्री आहे. गरज पडल्यास डीएनए विश्लेषण केले जाईल, असेही पट्टोजोशी म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मलंगगडावरून ओवैसींनी शिंदेंवर साधला निशाणा, तुम्हाला बाबरीमुळेचं…
दुसरीकडे, मल्लिक बरे होण्याच्या आशेवर असलेले कुटुंबीय आता त्याच्या मृतदेहाची मागणी करत आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांचे पार्थिव सामंतराय यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. स्फोटामुळे मृताचे चेहरे ओळखता येत नसल्याने हा गोंधळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास आता एसीपी दर्जाचे अधिकारी
भुवनेश्वरचे डीसीपी प्रतीक सिंह करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT