बीडसारखीच घटना संभाजीनगरमध्ये, बिल्डरला किडनॅप केलं, कपडे काढून मारलं, डोक्याला बंदूक लावून...
Samhbajinagar Crime : बीडमधील गुन्हेगारीची प्रकरणं, पुण्यातील टोळक्यांकडून होणाऱ्या घटनांची मालिका सुरूच असताना आता संभाजीनगरमध्येही एक धक्कादायक घटना घडली. संभाजीनगरमध्ये एका व्यावसायिकाचं अपहरण केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संभाजीनगर पश्चिममधून विधानसभा लढणारा आरोपी

संभाजीनगर पोलिसांकडून आरोपीला अटक

एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल
Sambhajinagar Kidnapping News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडलेल्या गुन्हेगारींच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. बीडमधील गुन्हेगारीची प्रकरणं, पुण्यातील टोळक्यांकडून होणाऱ्या घटनांची मालिका सुरूच असताना आता संभाजीनगरमध्येही एक धक्कादायक घटना घडली. संभाजीनगरमध्ये शरद राठोड नावाच्या एका व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं होतं. राठोड यांना अपहरण करुन मारहाण करण्यात आली, तसंच त्यांच्या सहकाऱ्यांनाही मारण्यात आलं. ज्या आरोपीने हे सगळं केलं, तो म्हणजे विधानसभा निवडणूक लढवलेला संदीप शिरसाट. (Sambhajinagar Builder kidnapping Case)
हे ही वाचा >> 'दीनानाथ' प्रकरणात वादळाच्या केंद्रस्थानी, राजीनामा देणाऱ्या डॉक्टर घैसास यांची हिस्ट्री काय?
संभाजीनगरमधील या टोळीने व्यावसायिक शरद राठोड यांचं अपहरण केलं होतं. पोलीस पुत्र असलेला संदीप शिरसाट (Sandip Shirsat) या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. घडलं असं की, शिरसाटसोबत अभिजित बर्डे नावाचा तरूण काम करायचा. बांधकामाच्या टेंडरचे काम शिरसाट करत असत. या कामात अभिजित बर्डे शिरसाटला सहाय्यक म्हणून काम करायचा. मात्र, बराच काळ काम केल्यानंतर शिरसाट त्याला त्रास द्यायचा. म्हणून त्याने नंतर शहरातील देवळाई परिसरातील शरद राठोड यांच्याकडे काम सुरू केलं.
संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवलेले संदीप शिरसाट आणि त्याच्या साथीदारांनी याच कारणावरुन राठोड आणि त्याच्या सहकाऱ्याचं अपहरण केलं. यावेळी दहा-पंधरा लोकांनी व्यावसायिक शरद राठोड यांना पट्ट्याने मारहाण केली. शिरसाटने तर थेट बंदूक काढून मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या.
हे ही वाचा >> Fact Check: मुंब्य्राचा 'तो' Video अन् राज ठाकरेंना विचारतायेत जाब.. काय आहे हे सगळं प्रकरण?
शिरसाटने नंतर अभिजित बर्डेलाही तिथे बोलवून घेतलं. संदीपच्या माणसांनी अभिजीतलाही पकडून जोरदार मारहाण केली. याप्रकरणी शरद राठोड यांनी पोलिसात तक्रार केली आहे. त्यानंतर सातारा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी शिरसाटलाही अटक केली आहे. टेंडर घेण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचीही माहिती आहे. तरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.