बिल्डिंगच्या डक्टमध्ये सापडला अर्धनग्नावस्थेत तरूणीचा मृतदेह, दृश्य पाहून सगळेच हादरले
Thane Crime News: मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. परिसरातील लोकांची गर्दीही घटनास्थळी जमली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

निवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये सापडला मृतदेह

10 वर्षाच्या तरूणीचा मृतदेह होता अर्धनग्नावस्थेत

जोरात आवाज झाल्यानं वाकून पाहिलं आणि हादरले स्थानिक
Thane Crime News : ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 10 मजली निवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला. अत्यंत संशयास्पद स्थितीत हा मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोमवारी रात्री 11.48 वाजता मुंब्रा परिसरातील सम्राट नगरमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. इमारतीची रहिवासी नसलेली ही मुलगी एका डक्टमध्ये पडलेली स्थानिकांना आढळली. ही अल्पवयीन मुलगी इथे आली कशी हा प्रश्न अनेकांना पडला होता.
अर्धनग्न अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह
हे ही वाचा >> 'दीनानाथ' प्रकरणात वादळाच्या केंद्रस्थानी, राजीनामा देणाऱ्या डॉक्टर घैसास यांची हिस्ट्री काय?
मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. परिसरातील लोकांची गर्दीही घटनास्थळी जमली होती. हा अपघात होता की घातपात हे अजून समोर येऊ शकलेलं नाही. मुलीसोबत काही गैरकृत्य झालंय का हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मृत मुलगी ही ठाकूर पाडा परिसरातील रहिवासी होती.
जोरात आवाज आला, मृतदेह पाहून हादरलो...
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारा इरफान म्हणाला, की पाणी येत नव्हतं. तेव्हा जोरात आवाज आला. आवाज आला तेव्हा, मला वाटलं पाण्याचा पाईप तुटला असेल. मी खिडकी उघडून पाहिलं तर तिथे एका 9 ते 10 वर्षांच्या मुलीचा मृतदेह पडलेलेला होता. मुंब्रा पोलिस स्टेशनला कळवलं असता ते अग्निशमन विभागाच्या पथकासोबत तिथे पोहोचले. मुलीचा मृतदेह अरूंद जागेत पडलेला असल्यानं बचावकार्य आव्हानात्म होतं. त्यानंतर मोठ्या परिश्रमानंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलीला बाहेर काढलं.
हे ही वाचा >> बीडसारखाच पॅटर्न संभाजीनगरमध्ये, बिल्डरला किडनॅप केलं, कपडे काढून मारलं, डोक्याला बंदूक लावून...
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात या मुलीला नेण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.