तृतीयपंथी प्रियावरील प्रेम ठरलं जीवघेणं; हिंगोलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ
Crime: हिंगोलीत एका तृतीयपंथीयाने एका तरूणाची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. तरूणाने लग्नाला नकार दिल्याने किन्नरने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
Crime News: हिंगोली: लग्नास नकार दिल्याने एका तृतीयपंथीयाने (Transgender) एका तरुणाचा गळा आवळून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत (Hingoli) घडली आहे. अशोक आठवले असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तृतीपंथीयाने अशोकची हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं भासवलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयातही नेले. मात्र, डॉक्टरांनी अशोकला मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हेगार किन्नर प्रिया उर्फ दीपक नरसिंग तुरमालू आणि शेख जावेद यांना अटक केली. (in hingoli a transgender strangles a young man to death for refusing marriage)
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीतील नवलगव्हाण येथील अशोक आठवले हा तरूण गेल्या अनेक दिवसांपासून हिंगोली येथे रिक्षा चालवत होता. याच दरम्यान अशोकची ओळख किन्नर प्रियाशी झाली होती. याच ओळखीचे रुपांतर हळूहळू मैत्रीत झाले. त्यानंतर किन्नर प्रिया ही अशोकच्या प्रेमात पडली.
30 मार्च गुरूवारी रात्री किन्नर प्रिया उर्फ दीपक ही अशोकसोबत लग्नासाठी हट्ट करत होती. यावेळी अशोकने आपण लग्न करू शकत नाही. असं म्हणत किन्नर प्रियाला लग्नासाठी नकार दिला. दरम्यान, अशोककडून नकार मिळाल्याने प्रिया प्रचंड चिडली. त्यामुळे तिने शेख जावेद शेख ताहेर कुरेशी यांच्या साथीने मिळून अशोकची गळा दाबून हत्या केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान, अशोकचा मृत्यू झाल्याचे समजताच प्रिया आणि जावेदने अशोकला हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांनी असं सांगितलं की, अशोकने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी डॉक्टरांनी अशोकला मृत घोषित केले.
आरोपी कसे सापडले पोलिसांच्या जाळ्यात?
या घटनेची माहिती मिळताच हिंगोली पोलिसांनी रुग्णालयात येऊन किन्नर प्रिया आणि तिचा साथीदार शेख जावेद यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला या दोघांनीही अशोकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं म्हणत होते. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही आपणच अशोकची हत्या केल्याचं कबूल केलं. आता याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी प्रिया उर्फ दीपक आणि तिचा साथीदार शेख जावेद यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT