Pune Accident प्रकरणात तीन जणांना अटक, आमदार सुनील टिंगरे गायब?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pune porsche accident news three arrested sassoon hospital blood sample departemenk sunil tingare connection with dr ajay taware
आमदार सुनील टिंगरे गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.
social share
google news

Pune Porsche Accident News : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यात आता या प्रकरणात ससून रूग्णालयात (Sassoon Hospital) रक्ताचे नमूने बदलल्या प्रकरणी डॉ. अजय तावरे (Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हळणोर या दोन डॉक्टरांसह शिपाई अतुळ घटकांबळे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. या अटकेनंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare)  यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यात आमदार सुनील टिंगरे गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुनील टिंगरे नेमके कुठे आहेत? अशी चर्चा आता सूरू आहे. (pune porsche accident news three arrested sassoon hospital blood sample departemenk sunil tingare connection with dr ajay taware) 

खरं तर पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणात सुरूवातीपासून सुनील टिंगरेंचं नाव चर्चेत येत होते. ज्या रात्री ही अपघाताची घटना घड़ली, त्या दिवशी एक आमदार पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती सुरूवातीला समोर आली होती. हा आमदार नंतर वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरेंचे नाव समोर आले होते. या घटनेनंतर टिंगरे समोर न आल्याने अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत होता.

हे ही वाचा : बिल्डरच्या तालावर नाचली व्यवस्था, पुण्यात यंत्रणेची लक्तरं..

पण या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने अखेर सुनील टिंगरे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी टिंगरेंनी विशाल अग्रवालशी माझे जूने संबंध असल्याची माहिती दिली. विशाल अग्रवालचा मला फोन आला होता आणि त्याच्याच सांगण्यावरूनच मी पोलीस स्टेशनला गेल्याचे टिंगरे यांनी सांगितले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणात नंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले होते. यानंतर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने ससून रूग्णालयात बदलल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर या दोन डॉक्टरांसह शिपाई अतुळ घटकांबळे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. 

हे ही वाचा : 'शरद पवारांसाठी मरायला तयार, पण सुप्रिया सुळेंमुळे...', दुहानांची खदखद

या अटकेतही आता सुनील टिंगरेंचं एक नवीन कनेक्शन समोर आले आहे. ससून रूग्णालयातील एका डॉक्टरांच्या शिफारशीसाठी सुनील टिंगरेंनी 2023 मध्ये एक पत्र दिले होते. हे डॉक्टर अजय तावरे होते. अजय तावरे यांची नियुक्ती ससून रुग्णालयाच्या अधीक्षकपदी करावी, अशी मागणी करणारे शिफारस पत्र आमदार सुनील टींगरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहले होते. त्यामुळे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपी डॉक्टर अजय तावरेंची शिफारस केल्याने पुन्हा एकदा सुनील टिंगरे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान आता सुनील टिंगरे नेमके गेले कुठे? गायब आहेत की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच या प्रकरणात वारंवार सुनील टिंगरेंचे नाव समोर येत असल्याने पोलीस त्यांना चौकशीला बोलावण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT