Pune Hit And Run Case: अल्पवयीन आरोपीची RTO मध्ये झाली १५ दिवसांची ट्रेनिंग, नेमकं काय घडलं? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pune Porsche Car Case Latest Update :
Pune Porsche Car Case Latest Update :
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"अल्पवयीन आरोपीला फिल्ड ट्रेनिंगसाठीही पाठवण्यात आलं..."

point

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी दाखल केलं होतं आरोपपत्र

point

अल्पवयीन आरोपीची RTO मध्ये झाली १५ दिवसांची ट्रेनिंग

Pune Porsche Car Case Latest Update : पुण्यात १९ मेला झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुण्यातील बांधकाम व्यवसायीक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारची दुचाकीला धडक देऊन दोन जणांचा बळी घेतला होता. पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात झालेल्या या अपघातात मध्य प्रदेशच्या तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. कायदेशीर कारवाईला सामोरं गेल्यानंतर आता अल्पवयीन मुलाचा ड्रायव्हिंग कोर्स पूर्ण झाला आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये अल्पवयीनला १५ दिवसांचं सेफ ड्रायव्हिंग प्रोग्रॅम पूर्ण करायचं होतं. आरटीओच्या एका अधिकाऱ्याने याबाबत महिती दिलीय. (New shocking revelations are coming out in the case of Porsche car accident that happened on May 19 in Pune. The minor son of Vishal Agarwal, a construction professional in Pune, had rammed his Porsche car into a two-wheeler, killing two people)

"अल्पवयीन आरोपीला फिल्ड ट्रेनिंगसाठीही पाठवण्यात आलं..."

ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये रोड ड्रायव्हिंग सेफ्टीबाबत माहिती, ड्रायव्हिंग लायसेन्सचं महत्व, रोडवर लावण्यात आलेल्या सूचना आणि चिन्हांचा अर्थासह अन्य आवश्यक माहितीचा समावेश होता. या प्रकियेदरम्यान अल्पवयीन आरोपीला ऑन फिल्ड ट्रेनिंगसाठीही पाठवण्यात आलं होतं. अल्ववयीनने याआधी ३०० शब्दांचा निबंध लिहिला होता. या हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील, दादा, आई आणि ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर, एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा >> Crime: बदलापूर हादरलं! चिमुरड्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार; संतप्त पालकांनी काढला मोर्चा

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी दाखल केलं होतं आरोपपत्र

जवळपास दोन महिन्यांच्या तपासानंतर या प्रकरणात पोलिसांनी २३ जुलैला ९०० पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. सेशल कोर्टात दाखल झालेल्या आरोपपत्रात १७ वर्षांच्या अल्पवयीन आरोपीच्या नावाचा समावेश नव्हता. अल्पवीयनचं प्रकरण जुवेनाइल जस्टिस बोर्ड (JJB) यांच्याकडे पाठवण्यात आलंय. या प्रकरणात गुन्हेगारीचं कटकारस्थान रचण्याचा आणि साक्ष मिटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ७ जणांवर आरोप करण्यात आले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shreyas Talpade: "मी जिवंत आहे, माझी मुलगी..."; निधनाच्या अफवा पसरवाणाऱ्यांना श्रेयस तळपदेनं झापलं

जुवेनाईल जस्टिस बोर्डाद्वारे या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला रस्ते सुरक्षिततेच्या विषयावर निबंध लिहिण्याची अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर देशभरात या प्रकरणी संताप व्यक्त करण्यात आला होता. तसच अल्पवयीनचा गुन्हा लपण्यासाठी अगरवाल कुटुबीयांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं. सूसन रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याचंही समोर आलं होतं. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT