Sakshi Murder Case : वेब सीरिजने दिली क्रूर कटाची आयडिया, हत्येपूर्वी साहिलने काय केलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sakshi murder case accuse sahil confesses killing 16 year old sakshi delhi shahdabad case
sakshi murder case accuse sahil confesses killing 16 year old sakshi delhi shahdabad case
social share
google news

Delhi Shahbad Dairy Sakshi Murder Case : दिल्लीच्या शाहबाद (Delhi Shahdabad) डेअरी परीसरात घडलेल्या साक्षी हत्याकांडाने (Sakshi Murder) संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या घटनेतील आरोपी साहिलला उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) बुलंद शहरातून अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर साहिलने साक्षीच्या हत्येचा कबुलनामा दिला होता. त्यासोबत या घटनेचा मला अजिबात पछतावा होत नसल्याचे सांगितले होते. दरम्यान या साक्षीच्या हत्याकांडात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता साहिलने एक वेबसीरीज पाहून हे संपूर्ण हत्याकांडा घडवल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी ही वेबसीरीज काय होती? हे जाणून घेऊयात.(sakshi murder case accuse sahil confesses killing 16 year old sakshi delhi shahdabad case)

ADVERTISEMENT

साहिलच्या अटकेनंतर दररोज अनेक खुलासे होत आहेत. या खुलास्यानंतर साक्षी हत्याकांडातील आरोपी साहिल किती क्रुरकर्मा होता, याचा नवनवीन दाखला मिळत आहेत. नुकतीच आरोपीच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून देखील धक्कादायक माहिती मिळाली होती. आरोपीच्या इन्स्टाग्रामवरून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल हा दारू आणि हुक्का पार्टी करण्याचा शौकीन होता. या संबंधित अनेक व्हिड़िओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. एकूणच यावरून तो किती नशेबाज होता, हे स्पष्ट झाले होते.

हे ही वाचा : Crime: दोन व्हिडिओ कॉल अन् त्यानंतर… साक्षीच्या हत्येबाबत आरोपी साहिलकडून मोठा खुलासा

पोलिसांच्या प्रश्नांना काय उत्तरे दिली?

पोलीस : तू साक्षीची हत्या का केलीस?
साहिल : मला हत्येचा पश्चाताप नाही.
पोलीस : तू का हत्या केलीस?
साहिल : मी साक्षीला धडा शिकवला.
पोलीस : साक्षीची इतकी निघृण हत्या का केलीस?
साहिल : मी काहीच सांगू शकत नाही
पोलीस : साक्षीसोबत काही भांडण झाले होते?
साहिल : मला काहीच सांगायचे नाही आहे.
पोलीस : साक्षीला आधीपासून ओळखायचास?
साहिल :हो पहिल्यापासून ओळखायचो.
पोलीस : हत्येची कल्पना कशी सुचली?
साहिल : हत्या करायची होती आणि हत्या करून टाकली.
पोलीस : हत्येत वापरलेला चाकु कुठे आहे?
साहिल : मला माहित नाही चाकु कुठे आहे.
पोलीस : हत्येनंतर कुठे-कुठे गेलेलास?
साहिल : मला काहिच सांगायचे नाही आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वेबसीरीज पाहून हत्याकांड

साहिलची चौकशी करण्यासाठी एक स्पेशल टीम नेमण्यात आली होती. या टीममध्ये सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांसह मनोवैज्ञानिक होते. यावेळी ऑन कॅमेरा करण्यात आलेल्या चौकशीत त्याने तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान साहिलने एका वेबसीरीजचे नाव घेतले होते. सायको किलरवर आधारीत ही वेबसीरीज होती आणि ती त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. ही वेबसीरीज पाहून साहिलने साक्षीच्या हत्येचा कट रचला होता. आता ही वेबसीरीज काय होती,या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करते आहे.

हे ही वाचा : Sakshi Murder : 24 महिन्यांपूर्वी भेटला अन् जीव घेऊनच थांबला, कोण आहे साहिल?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT