Sex Racket in Navi Mumbai : नवी मुंबईत घरातच सुरू होता वासनेचा बाजार, सेक्स रॅकेटचा पोलिसांनी कसा केला टप्प्यात कार्यक्रम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sex racket busted in navi mumbai navi mumbai two women  arrested one bangladeshi women rescue taloja shocking story
नवी मुंबईतून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

point

दोन महिलांना केली अटक

point

एका बांग्लादेशी महिलेची सुटका

Sex Racket Busted in Navi Mumbai : नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील तळोजा परिसरातील एका घरात बिनधास्तपणे सेक्स रँकेट चालवलं जात होतं. या सेक्स रँकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.  या प्रकरणात पोलिसांना दोन महिलांना अटक केली आहे. तसेच या महिलांच्या तावडीतून एका बांग्लादेशी महिलांची सूटका करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. (sex racket busted in navi mumbai navi mumbai two women arrested one bangladeshi women rescue taloja shocking story)

ADVERTISEMENT

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या मानवी तस्करी विरोधी विभागाला एका घरात सेक्स रँकेट चालवले जात असल्याची माहिती गुप्त सुत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी घरात एक डमी ग्राहक पाठवला होता. हा डमी ग्राहक घरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकला होता. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT: 'हेच निष्ठेचं फळ?', ठाकरेंना मोठा धक्का.. कट्टर शिवसेना नेत्याचा थेट राजीनामा!

पोलिसांच्या या छाप्यात हे संपूर्ण रॅकेट ऑपरेट करणारी हसीना मुशर्ऱफ खान (30) हीला अटक केली. तसेच घटनास्थळी ग्राहकांना सालिया सफिक खान (39) या महिलेला डिजिटल पद्धतीने पैसे देण्यास सांगितले असल्याचेही त्यांना आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, हसीना ही मुळची बांग्लादेशची असून अन्य आरोपी हे कोलकत्ताचे असल्याची  माहिती आहे. आणि या महिलांच्या तावडीतून सूटका करण्यात आलेल्या महिलेला मुंबईच्या चेंबूर येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तसेट अटक करण्यात आलेल्या महिलांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 143 (2) (व्यक्तीची तस्करी),3(5) (सामान्य हेतू) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा अंतर्गत तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.  

हे ही वाचा : Salman Khan Case : लॉरेन्सच्या नावाने सलमानला धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, भाजीवाला म्हणाला मी...|Shiv Sena UBT|

    follow whatsapp

    ADVERTISEMENT