Baramati : बोगस मतदान, कार्यकर्त्यांना धमक्या... बारामतीमध्ये काय चाललंय? अजित पवारांनी काय उत्तर दिलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामतीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप

point

शरद पवार यांच्या पक्षाकडून अजितदादांवर आरोप

point

शर्मिला ठाकरेंच्या आरोपांवर काय म्हणाले अजितदादा?


Baramati Vidhan Sabha Elections : राज्यभर सध्या मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. सकाळी सात वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत राज्यात 18.14 टक्के झालं. बडे नेते, सेलिब्रिटी, मंत्री ते थेट राज्यपालांपर्यंत सर्वांना मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर यंदा संपूर्ण राज्याचं लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघावर लागून आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आता दोन पवार एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहेत. पवार कुटुंबातले अनेक सदस्य सध्या या निवडणुकीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झाले आहेत. त्यामुळेच बारामतीमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्र्वादीचे उमेदवार असलेल्या युगेंद्र पवार यांच्या आईकडून मतदान केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

 

शर्मिला पवार यांचे आरोप

 

बारामतीमध्ये काही मतदान केंद्रांवर बसलेल्या पोलिंग एजंटकडून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. बोगस मतदान होत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या पक्षाकडून होताना दिसतोय. तसंच घड्याळ वाल्या लोकांकडून काहीतरी गैरप्रकार होत असल्याचा आरोप युगेंद्र पवार यांच्या आईकडून करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर घड्याळवाले लोक असून, ते लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पवार गटाकडून व्यक्तक करण्यात येतोय. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात येत असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

अजित पवार यांचं प्रत्युत्तर

 

तक्रारीला काहीच अर्थ नाही असं म्हणत अजित पवार यांनी शर्मिला पवारांचे आरोप फेटाळले आहेत. आमच्याच कार्यकर्त्याला मतदान केंद्राबाहेर काढलं. एजंटला बाहेर काढण्याचा अधिकार नाही, माझे पोलिंग एजंट असं काही करणार नाही, शर्मिला पवार यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार बोलताना अजित पवारांनी आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तसंच विरोधकांच्या बोलण्यात तथ्य नाही असं अजित पवार म्हणाले. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

पश्चिम महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत किती मतदान? 
 

मावळ 17.92%
चिंचवड 16.97%
पिंपरी 11.46%
जुन्नर 18.57%
आंबेगाव 16.69%
खेड आळंदी 16.40%
शिरूर 14.44%
भोसरी 16.83%
हडपसर 11.46%
दौंड 17.23%
इंदापूर 16.20%
बारामती 18.81%
पुरंदर 14.44%
भोर 12.80%
खडकवासला 17.05%
वडगाव शेरी 15.48%
शिवाजीनगर 13.21%
कोथरूड 16.05%
पर्वती 15.91%
पुणे कॅन्टोन्मेंट 14.12%
कसबा पेठ 18.33%
वाई 18.55%
कोरेगाव 21.24%
कराड उत्तर 18.57%
कराड दक्षिण 19.71%
पाटण 18.93%
सातारा 19.97%
फलटण 17.98%
माण 15.21%
मिरज 17.70%
सांगली  19.60%
पलूस-कडेगाव 17.34%
खानापूर 16.25%
तासगाव 18.67%
जत 16.52%
इस्लामपूर 22.26%
शिराळा 20.49%
चंदगड 22.01%
राधानगरी 23.00%
कागल 23.68%
कोल्हापूर दक्षिण 17.57%
करवीर 26.13%
कोल्हापूर उत्तर 20.75%
शाहूवाडी 17.52%
हातकणंगले 14.25%
इचलकरंजी 19.77%
शिरोळ 21.43%
मोहोळ  17.22%
सोलापूर उत्तर 14.53%
सोलापूर मध्य 16.30%
अक्कलकोट 18.82%
सोलापूर दक्षिण 16.82%
पंढरपूर 12.22%
करमाळा 13.28%
माढा 11.12%
सांगोला 17.51%
माळशिरस 16.60%
बार्शी 17.51%

    follow whatsapp

    ADVERTISEMENT