शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांचा हात, हत्याकांडात नेमका काय होता रोल?
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. पुण्यातील महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करून आरोपीपर्यंत पोहचल्यानंतर त्यांच्याच वाहनात दोन वकील सोबत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे वकिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची नेमकी यामध्ये काय भूमिका आहे त्याचा पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर पुण्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आठ आरोपींना (8 accused) ताब्यात घेतले आहे. मात्र हत्या करण्यासाठी जी दोन वाहनं वापरण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 8 हल्लेखोर होते. त्यांच्यासोबतच आणखी दोन वकिलही (Two lawyers) होते, त्यामुळे पोलिसांनी आता त्या दोघांनाही ताब्यात घेऊन आता चौकशी सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
साथीदारानेच घातल्या गोळ्या
यावेळी पोलिसांनी सांगितले की, कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या ही त्याच्याबरोबर फिरणाऱ्या साथीदारानेच केली आहे. त्याच्याबरोबर साहिल उर्फ मुन्ना कोळेकर हा काही दिवसांपासून फिरत होता. त्याचा मामा नामदेव महिपती कानगुडे, विठ्ठल किसन गाणले या दोघांचेही शरद मोहोळबरोबर पूर्ववैमनस्य होते. त्या पूर्ववैमनस्यातूनच शरद मोहोळची हत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपास स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा >> कुख्यात गुंड शरद मोहोळच्या थरारक हत्याकांडाचे CCTV फुटेज आलं समोर, नेमकं काय घडलं?
दोन वकिलांचा सहभाग?
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या दोन वकिलांनाही ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या हत्येचा आणखी चर्चा होऊ लागली आहे. त्याच कारणातून हा हल्ला झाल्याचे आरोपीने सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वाहनातील आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याबरोबरच आणखी दोन वकिलही होते. त्या वकिलांचा सहभाग का आहे आण कसा आहे. त्याच्या तपासानंतर समजणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आर्थिक देवाण-घेवाण
पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज आल्याने आता तपासाला गती मिळणार असल्याचे सांगितले. शरद मोहोळच्या बरोबर जे साथीदार म्हणून फिरत होते, त्यांनीच त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. यामागे जमिनीचा वाद, आर्थिक देवाण-घेवाण असे वाद असल्याचेही पोलिसांनीही सांगितले. आरोपींचा शोध घेण्यासाठी 8 पथकांची तयार करण्यात आली होती.
हे ही वाचा >> नवऱ्याच्या मृत्यूचा धसका घेत पत्नीचं सुसाईड, अंत्यसंस्कारानंतर वेगळंच सत्य आलं समोर
ADVERTISEMENT