Crime: दोन व्हिडिओ कॉल अन् त्यानंतर… साक्षीच्या हत्येबाबत आरोपी साहिलकडून मोठा खुलासा
Sakshi-Sahil Murder Case: राजधानी दिल्लीतील साक्षीच्या हत्येप्रकरणी आता नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. जाणून घ्या साक्षीच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय-काय घडलं.
ADVERTISEMENT
Delhi Crime: नवी दिल्ली: दिल्लीतील (Delhi) साक्षी हत्या (Sakshi Murder) प्रकरणात आता अनेक खुलासे होत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी साहिल खानने (Sahil Khan) गुन्ह्याची कबुली दिली आहे. या खून प्रकरणात अनेक थिअरी पोलिसांसमोर येत आहेत. घटनेच्या एक दिवस आधी साक्षी, तिची मैत्रिण भावना आणि झबरू नावाच्या मुलाने मिळून आरोपी साहिलला धमकावले होते. असंही आता समोर येत आहे. (two video calls two voice notes sakshi and sahil had a heated argument on the day of the murder)
ADVERTISEMENT
साक्षीच्या हत्येनंतर तिची मैत्रीण भावना हिने एक ऑडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये साक्षी साहिलशी बोलत असल्याचं समजतं आहे. साक्षी म्हणतेय, ‘तू जास्तच बदमाश आहेस, आता कुठे गेली तुझी बदमाशी.’
धमकीनंतर ऑडिओ कॉल कडक केला
या ऑडिओमध्ये साहिलचा आवाज येत नसून फक्त साक्षी बोलत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि साहिलचा 27 मे रोजी दुपारी 3:41 वाजता व्हिडिओ कॉल झाला होता, जो बराच वेळ चालला होता. यानंतर, 28 मे रोजी म्हणजेच हत्येच्या दिवशी सकाळी 7:19 वाजता साहिल आणि साक्षीमध्ये दोन व्हिडिओ कॉल्स झाले. या दिवशी दोन व्हॉईस नोटही पाठवण्यात आल्या होत्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
साक्षीची झबरूशी मैत्री
साक्षीला सपोर्ट करताना झबरूने साहिलला धमकी दिली होती. या धमकीनंतर साक्षीने साहिलला फोन करून ऑडिओ पाठवून त्याला उकसवण्याचा प्रयत्न करत होती. पोलीस कोठडीत असलेल्या साहिलने सांगितले की, मृताची नुकतीच झबरू नावाच्या मुलाशी मैत्री झाली होती. झबरू हा त्या भागातील दबंग मुलगा आहे. घटनेच्या एक दिवस आधी साक्षीची मैत्रिण भावना, स्वतः साक्षी आणि झबरू त्याला भेटले होते आणि तिघांनीही त्याच्याशी वाद घातला होता.
हे ही वाचा >> Sakshi Murder : स्नेहा, निक्की, श्रद्धा आणि निकिता; प्रियकरांच्या क्रूर कहाण्या
झबरूनेही दिलेली साहिलला धमकी
यादरम्यान झबरूने देखील साहिलला साक्षीपासून दूर राहावं यासाठी धमकी दिली होती. याच गोष्टीचा साहिलला खूप राग आला होता. त्यामुळेच त्याने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला. मात्र, आरोपी खरे बोलतोय की खोटे बोलतोय याची पडताळणी केली जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे साहिल खानला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ADVERTISEMENT
दिल्ली सरकार कुटुंबाला मदत करेल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात साक्षी हत्याकांडातील पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्ली सरकार साक्षीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत करेल आणि आरोपींना कोर्टाकडून कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
ADVERTISEMENT
बुलंदशहर येथून आरोपीला अटक
विशेष म्हणजे साक्षी हत्याकांडातील आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक करण्यात आली होती. रविवारी साहिलने 16 वर्षीय अल्पवयीन साक्षीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केलेली. त्याने साक्षीवर केवळ चाकूने वार केले नाही तर तिला वारंवार दगडाने ठेचले. ही घटना घडल्यानंतर तो फरार झाला होता आणि बुलंदशहर येथे मावशीच्या घरी लपला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी साहिलने आपला फोनही बंद केला होता. मात्र, साहिलच्या कॉल रेकॉर्डच्या आधारे दिल्ली पोलिसांनी त्याला बुलंदशहर येथून अटक केली होती.
साहिलने दिली गुन्ह्याची कबुली
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, साहिलला हत्येचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता त्याने व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा आपणच असल्याचे कबूल केले. पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली देताना तो म्हणाला, मीच साक्षीची हत्या केली आहे. यादरम्यान आणखी एक खुलासा झाला आहे की, साक्षीला साहिलचे पूर्ण नाव ‘साहिल खान’ असल्याचे माहित होते. तसेच साक्षी आणि साहिल दोघेही एकमेकांना तीन वर्षांपासून ओळखत होते. दोघेही एकमेकांचे इन्स्टा अकाउंट फॉलो करत होते.
हे ही वाचा >> Sex Racket: ‘डार्क रुम’मध्ये ‘डर्टी पिक्चर’.. कुठे सुरू होतं खुलेआम सेक्स रॅकेट?
साहिलला कशी झाली अटक?
हत्या करून पळून गेल्यानंतर साहिलला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याने फोन बंद केला आणि रिठाला येथे पोहचला. तेथे त्याने खुनात वापरलेले हत्यार फेकून दिले. त्यानंतर तो बस पकडून बुलंदशहरला पळून गेला होता. पोलिसांना चकमा देण्यासाठी बुलंदशहर येथे जात असताना व्यावसायिक गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी साहिलने दोन बस बदलल्या होत्या.
एक फोन कॉल आणि साहिलचे गुपित उघड झाले
दुसरीकडे, साक्षीच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला. यानंतर पोलीस मृताच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. जिथे त्याने मारेकऱ्याची ओळख साहिल अशी सांगितली. यानंतर पोलीस साहिलच्या घरी पोहोचले, तो घरी उपस्थित नव्हता. यानंतर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यामुळे साहिलच्या मावशीने फोन करून साहिलच्या येण्याची माहिती त्याच्या वडिलांना दिली. या फोन कॉलद्वारे पोलिसांना त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात यश आले. यानंतर साहिलच्या वडिलांसोबत दिल्ली पोलिसांचे पथक बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन हद्दीतील अटेरना गावात पोहोचले. तेथून पोलिसांनी त्याला अटक केली.
ADVERTISEMENT