Krishnagiri: युट्यूबवर व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हरी…,बायकोसोबत घडली भयंकर घटना
एका नवऱ्याने युट्यूबवरून डिलिव्हरी कशी करतात याचे प्रशिक्षण घेतले आणि याचा प्रयोग बायकोवर केला असता तिचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. तामिळनाडूत ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
युट्यूबच्या (Youtube) माध्यमातून अनके गोष्टी शिकता येतात. पण त्या गोष्टींचा आपल्याला कसा फायदा करून घ्यायचा असतो. हे सर्व आपल्यावर निर्भर असते. काही जण युट्यूबवरून चुकीच्या गोष्टी शिकतात आणि चोरी करतात. अशा देखील घटना समोर आल्या आहेत. त्यात आता एका नवऱ्याने (Husband) युट्यूबवरून डिलिव्हरी कशी करतात याचे प्रशिक्षण घेतले आणि याचा प्रयोग बायकोवर (Wife) केला असता तिचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. लोगनयाकी (27) असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत मृत महिलेच्या पतीला अटक होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत (Tamilnadu) ही घटना घडली आहे. (women dies husband perform home birth allegedly watching youtube video tamil nadu krishnagiri shocking story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तामिळनाडूच्या (Tamilnadu) कृष्णागिरीमध्ये मधेश आणि लोगनयाकी हे जोडपं राहते. लोगनयाकी ही गर्भवती होती. या दरम्यान मधेशने तिला रूग्णालयात न नेताच घरातच तिची डिलिव्हरी करण्याचे ठरवले होते. या डिलीव्हरी दरम्यान लोगनयाकीला खूप जास्त रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे मधेशने तिला रूग्णालयात दाखल करताच पोलिसांनी तिला मृत घोषित केले होते. या घटनेने सध्या गाव हादरलंय.
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर : आईनेच 20 वर्षाच्या लेकीला पेटवले, कारण ऐकून पोलिसही हादरले
दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पती मधेशने युट्यूबवर व्हिडिओ पाहून लोगनयाकी हिची घरीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. मधेशने सुरुवातीला डिलिव्हरी कशी करतात, याची संपूर्ण माहिती युट्युबवरून मिळवली. ही माहिती घेतल्यानंतर त्याने बायको लोगनयाकीला रूग्णालयात न नेताच घरातच डिलिव्हरी केली. बायकोला प्रसुती कळा सुरु झाल्यानंतर मधेशने घरात डिलीव्हरी केली. या दरम्यान लोगनयाकीने एका बाळाला जन्म दिला. या बाळाच्या जन्मानंतर ती बेशूद्ध झाली होती. त्यामुळे मधेशने तिला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यानच तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर डॉक्टरांनी या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली. मधेशच्या बायकोने एका बाळाला जन्म दिला होता. या जन्मानंतर मधेशने गर्भनाळ व्यवस्थित कापली नव्हती. ज्यामुळे मधेशच्या बायकोला खूप जास्त रक्तस्त्राव झाला आणि या रक्तस्त्रावामुळे ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 (अनैसर्गिक मृत्यू) अंतर्गत तक्रार दाखल करून घेतली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना युट्यूब व्हिडिओ पाहून डिलीव्हरी केल्याचा माहिती मिळाली आहे. तपासात ही गोष्टी खरी निघाल्यास पती मधेशवर अटकेची कारवाई होणार आहे.या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Goa Crime news : तरुणीसह तिच्या मित्राला बेदम मारहाण; घटनेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT