Yavatmal: पैसे देणाऱ्याचाच गळा चिरला; मध्यस्थी करणाऱ्याचे डोके फोडले, कुटुंबीय सुन्न
Yavatmal Murder : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद गावामध्ये उसने पैसे मागूनही दिले नाहीत म्हणून एकाने गळा चिरुन हत्या केली आहे. तर वाद सोडवण्यास गेलेल्यावरही हल्ला करुन त्याचेही डोकं फोडलं आहे.
ADVERTISEMENT
Yavatmal Murder : पैसे उसनवारीच्या वादातून एका दुकान मालकाची गळा चिरून हत्या (Murder) करण्यात आली. तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर हल्ला करून त्यालाही जखमी करण्यात आले. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या युवकाच्याही डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील धनसळ (Dhansal) इथे घडली आहे. यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव सुरेशचंद्र कवडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये ही घटना घडल्याने धनसळसह परिसरात आता दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील आरोप खंडू गुळवे हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
पैसे देऊनही हत्या
हत्या झालेली व्यक्ती सुरेशचंद्र कवडे आणि खंडू गुळवेचा काही दिवसापूर्वी आर्थिक व्यवहार झाले होते. त्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीतून आता त्यांचा वाद झाला होता. त्या वादातूनच गुळवेन धारदार शस्त्राने कवडे यांच्यावर वार करुन त्यांना ठार केले. त्यानंतर मध्यस्थी करायला आलेल्या युवकावरही गुळवे हल्ला चढविल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा >> Kolhapur Crime News : छेडछाड करणाऱ्या तरुणांना पोलिसांआधीच जमावाने घडवली अद्दल
आर्थिक व्यवहार अंगलट
सुरेशचंद्र कवडे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितले की, तीन वर्षांपूर्वी आरोपी खंडू गुळवे याने सुरेशचंद्रकडून 50 हजार रुपये उधारीने घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा दोन दिवसापूर्वी त्याने पुन्हा कवडे यांच्याकडे 10 हजार रु उधारीने मागितले होते. आधीचे पैसे दिले नसल्याने सुरेशचंद्र कवडे यांनी आता त्याला पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळेच त्यांचा वाद होऊन गुळवेने सुरेशचंद्र कवडे यांच्यावर हल्ला केला.
हे ही वाचा >> Madurai Train fire : रेल्वेत गॅस सिलिंडर घेतला अन् डबा पेटला; प्रायव्हेट पार्टी कोचमधील 10 जण होरपळले
मध्यस्थी करणाऱ्यावरही जीवघेणा हल्ला
सुरेशचंद्र कवडे हा किराणा दुकान मालक होता. त्याच्या मित्रासोबत ग्रामपंचायतीसमोर उभा होता. त्यावेळी आरोपी खंडू गुळवे त्या ठिकाणी आला आणि धारधार शस्त्राने गळा चिरला. तर वाद सोडवण्यासाठी आलेल्या प्रवीण थिटेवरही गुळवेने हल्ला केल्याने तोही या प्रकरणात गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
हत्या झाली आणि दहशत पसरली
ग्रामपंचायतीसमोरच वाद होऊन हत्या झाल्याने गावामध्ये आता दहशत पसरली आहे. तसेच घरातील जबाबदार व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT